Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला गदारोळ ग्रामसेवकाच्या जीवावर बेतला आहे. ग्रामसभेत काही नागरिकांनी केलेल्या हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या प्रयत्नामुळे आलेल्या तीव्र मानसिक तणावातून ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (Gram Sevak Prahlad Patil) (वय 54, रा. ओम नगर, पारोळा) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरा 6 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कामांच्या जुन्या बिलावरून वाद


मिळालेल्या माहितीनुसार, शिवरे गावात 16 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला गावातील तरुण मंडळींसह सरपंच, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सभा सुरू असताना जुन्या कामांच्या बिलावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तर काही तरुणांनी पाटील यांना जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या वादातून प्रचंड मानसिक धक्का बसल्यानं अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ग्रामसेवक पाटील हे सभेतून निघून आपल्या घरी गेले. (Jalgaon Crime News)



हृदयविकाराचा तीव्र झटका


तब्बेत खालावल्याने त्यांना तत्काळ पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात नेलं जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ग्रामसेवक पी. एन. पाटील यांच्या मृत्यूची बातमी पसरताच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पारोळा, जळगाव, अमळनेर, भडगाव आणि पाचोरा येथील ग्रामसेवक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात (Parola Police Station) धाव घेत ठिय्या आंदोलन केले. मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.(Jalgaon Crime News)



एका आरोपीस अटक


17 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक त्यांच्याशी वाद करणारा संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करत संबंधित सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन