Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2 ऑगस्ट रोजी लॉस एंजेलिसला परतल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) ताब्यात घेतले होते. सुटका झाल्यानंतर वालिया यांनी या काळात मानसिकदृष्ट्या खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे सांगितले.


वालिया हे त्यांच्या मैत्रीण लिसासोबत लॉस एंजेलिसला परतले होते. विमानतळावर परतल्यानंतर त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कॅलिफोर्नियातील अॅडेलँटो ICE प्रोसेसिंग सेंटरमध्ये नेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा फोन आणि इतर वैयक्तिक वस्तूही जप्त करण्यात आल्याने त्यांना बाहेरील जगाशी संपर्क साधता आला नाही.



वालिया यांची मैत्रीण लिसाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना या घटनेची माहिती दिली होती. वालिया यांच्या कुटुंबीयांसह वकिलांकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान, ICEकडून त्यांच्या ताब्याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या व्हिसाच्या स्थितीबाबतही वालिया यांनी सार्वजनिकपणे कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.


सुटकेनंतर वालिया यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. अटकेत असताना अनेक वेळा आपण पूर्णपणे खचून गेल्यासारखे वाटले आणि पुढे काय होईल याची चिंता होती, असे त्यांनी सांगितले. मात्र कुटुंबीय, मित्र, वकील आणि जॅझ संगीत क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांना या कठीण काळातून बाहेर पडण्याचे बळ मिळाले.


प्रितेश वालिया यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि तेथे संगीत क्षेत्रातील शिक्षण घेतले. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग असून इंस्टाग्रामवर त्यांना 57 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.


सुटकेनंतर सध्या काही काळ प्रसिद्धीपासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि विश्रांती घेण्याचा निर्णय वालिया यांनी घेतला आहे. त्यांच्या सुटकेनंतर त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.


Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि