Delhi CJP Protest : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनात होते माओवादी, जनसंघर्ष समितीचा आरोप

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात अरुण भेलके नावाची व्यक्ती सहभागी झाल्याचा दावा जनसंघर्ष समितीने केला आहे. भेलके यांच्या माओवादी पार्श्वभूमीवरून समितीने आंदोलनाचे आयोजक अभिजीत दिपके यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. (Delhi CJP Protest)


आंदोलनादरम्यान अरुण भेलके यांनी संसदेसंदर्भात आक्षेपार्ह आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचा समितीचा आरोप आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून, त्यामध्ये संसदेसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दिसत असल्याचा दावा समितीने केला आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे सत्यता पडताळण्यात आलेली नाही. जनसंघर्ष समितीच्या दाव्यानुसार, अरुण भेलके हे मूळचे चंद्रपूरचे असून सुरुवातीच्या काळात विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित होते. त्यानंतर त्यांचे माओवादी चळवळीशी संबंध आल्याचा तसेच चंद्रपूर-गडचिरोली परिसरातील जंगलात माओवाद्यांसोबत काम केल्याचा दावा समितीने केला आहे.



तपास यंत्रणांच्या कारवाईचा संदर्भ


समितीने केलेल्या दाव्यानुसार, अरुण भेलके यांनी माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत काम केल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता. तसेच माओवादी संघटनेच्या कथित नेटवर्ककडून त्यांना मुंबई-पुणे परिसरात काम करण्यासाठी पाठवण्यात आल्याचेही समितीने म्हटले आहे.


2014 मध्ये महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कासेवाडी परिसरातून भेलके यांना अटक केल्याचा दावा समितीने केला आहे. त्यांच्या ताब्यातून माओवादी चळवळीशी संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याचेही समितीचे म्हणणे आहे. अटकेच्या वेळी ते वेगळ्या नावाने आणि कथित बनावट ओळखीसह राहत असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप असल्याचे समितीने म्हटले आहे.


भेलके यांच्यावर यूएपीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना आठ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याचा दावा समितीने केला आहे. तसेच 2023 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आल्याचेही समितीचे म्हणणे आहे.



आंदोलनातील उपस्थितीवरून प्रश्नचिन्ह


जनसंघर्ष समितीचा मुख्य सवाल असा आहे की, अरुण भेलके यांची पूर्वीची न्यायालयीन पार्श्वभूमी आणि संबंधित प्रकरणे नोंदींमध्ये असल्यास, विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या प्रश्नावर आयोजित दिल्लीतील आंदोलनात त्यांची नेमकी भूमिका काय होती?लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संसदेसंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा आंदोलनातील सहभाग आयोजकांच्या निदर्शनास आला होता का, त्यांची भूमिका काय होती आणि त्यांच्या सहभागामागील उद्देश काय होता, असे प्रश्न समितीने उपस्थित केले आहेत.आंदोलनाचे आयोजक अभिजीत दिपके यांनी अरुण भेलके यांच्या उपस्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही समितीने केली आहे. त्यांच्या आंदोलनातील सहभागाची आयोजकांना माहिती होती का, याबाबतही समितीने स्पष्टता मागितली आहे.



चौकशीची मागणी


नक्षलवादामुळे प्रभावित नागरिकांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंदोलनात सहभागी व्यक्तींची पार्श्वभूमी, त्यांची भूमिका आणि कथित वक्तव्यांची सत्यता यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या नीट प्रश्नावर आयोजित आंदोलनात अरुण भेलके यांचा सहभाग नेमका कोणत्या भूमिकेत होता? त्यांच्या कथित वक्तव्याची सत्यता काय? आणि या सहभागाबाबत आंदोलनाचे आयोजक काय स्पष्टीकरण देणार?” असे प्रश्न देखील शिर्के यांनी उपस्थित केले आहेत.-

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि