Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल


मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha Sharma) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) भोपाळ न्यायालयात ६३६ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले असून, ट्विशाचा मृत्यू ही 'आत्महत्या'च असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेच्या आधीच्या ३० मिनिटांमधील घटनाक्रम या तपासात अत्यंत निर्णायक ठरला आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी पहिल्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केले होते; मात्र दिल्ली एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांच्या विशेष पथकाने केलेल्या दुसऱ्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही आत्महत्येच्या निष्कर्षालाच दुजोरा मिळाला आहे.



"मला शांततेत मरु दे..." वहिनीला पाठवलेला शेवटचा मेसेज


आत्महत्या करण्यापूर्वी ट्विशा शर्मा प्रचंड मानसिक तणावाखाली होती. १२ मे रोजी रात्री ९:३६ वाजता तिने आपली वहिनी राशी अब्रोल शर्मा हिला एक अत्यंत भावूक आणि धक्कादायक मेसेज पाठवला होता. "त्याला सांग की आपल्या बायकोच्या, म्हणजेच माझ्या उरल्यासुरल्या गोष्टी घेऊन जा. पण उद्या... मला आत्ता शांततेत मरु दे," असा मेसेज तिने वहिनीला केला आणि काहीच मिनिटांत तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याआधी तिने पती समर्थ सिंग याच्यासोबत सुरू असलेल्या वादांवरून कुटुंबीयांशी अनेकदा फोन आणि मेसेजद्वारे संवाद साधला होता, हे देखील तपासातून उघड झाले आहे.



पती आणि सासूविरोधात सीबीआयची कडक कारवाई


याप्रकरणी सीबीआयने ट्विशाचा पती समर्थ सिंग आणि तिची सासू, निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच हा हुंडाबळीचा आणि हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच सासूच्या प्रभावामुळे पहिल्या पोस्टमार्टम रिपोर्टशी छेडछाड झाल्याचा आरोप केला होता; परंतु जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एम्सच्या पथकाने निष्पक्ष तपास करत दुसरा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.



आरोपींच्या कोठडीत वाढ 


ट्विशा शर्माच्या कुटुंबाची बाजू मांडणारे वकील शुभांग दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले, ज्यानंतर न्यायालयाने आरोपी समर्थ सिंग आणि गिरीबाला सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. सीबीआयने आरोपींवर आवाजाचे नमुने (Voice Samples) देण्यास सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवला, तर बचाव पक्षाने तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावर आक्षेप नोंदवला. सध्या सीबीआय या प्रकरणाच्या पुढील कायदेशीर बाबींवर अधिक सखोल तपास करत आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि