Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या शिस्तीमुळे नगरसेवक राहिले उपाशी

- सभागृहात उपहारगृह बंदीवरून तीव्र नाराजीचे उमटले सूर


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेतील उपहारगृहात ताकामध्ये माशी सापडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने (FDA) कायदेशीर नोटीस पाठवून हे उपहारगृह बंद करण्यात आले. परंतु हे बंद करण्यात आलेले उपहारगृह सुरु करण्यात आले नसून याचा तीव्र पडसाद मंगळवारी महापालिका सभागृहात उमटले. सभागृह सुरु असताना त्याठिकाणी नगरसेवकांसाठी खाण्यापिण्याची काहीही व्यवस्था नव्हती. उपहारगृह बंद म्हणून ही सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या शिस्तीमुळे नगरसेवकांना उपाशी ठेवणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी त्वरीत याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले.



मुंबई महापालिका (BMC) सभागृह सुरु असताना माजी महापौर विशाखा राऊत यांनी पहिल्या बैठकीपासून आम्ही सांगतोय की कुणी तरी निविदा किंवा निविदा न मागवता एखादा कॅन्टीनवाल्याला नियुक्त करून नगरसेवकांसाठी सभागृहाच्या दिवशी खानपानाची व्यवस्था करावी. परंतु आता उपहारगृहच बंद आहे म्हणून नगरसेवकांना सभागृहाच्या दिवशी मिळणारी सेवाही बंद आहे. यातील सर्वांत जास्त नगरसेवकांना मधुमेहीचे आजार आहे. त्यांना वेळेत खावे लागते. ते उपाशी राहू शकत नाही. त्यामुळे ते सभागृहाच्या बाहेर जात आहेत. त्यामुळे पुढील सभागृहापूूर्वी नगरसेवकांसाठी याठिकाणी खानपान सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आरामचा वडापाव किंवा ठक्करची सेवा दिली जावी.



जोपर्यंत उपहारगृहासाठी चालकाची निवड होत नाही तोपर्यंत ही सेवा मिळायला हवी असे सांगितले. तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अन्न व औषध प्रशासनाने नक्की नोटीस का दिली? याबाबत कामगार अधिकाऱ्यांना अहवाल सादर करायचे निर्देश दिले तरीही ते दिले जात नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीमुळे सभागृहातील नगरसेवकांनी उपाशी राहायचे का? कामगारांनी उपाशी राहायचे का? त्यांच्या ज्या काही अटी असतील त्यानुसार पुढील कार्यवाही पूर्ण करा, पण एवढा बेफिकीरपणा का दाखवला जात आहे असा सवाल करत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर यावर महापौरांनी आपण त्यांचे जुने करार संपल्याशिवाय दुसरा ठेवू शकत नाही, मग तात्पुरता का ठेवू शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांनी दिले.

Comments
Add Comment

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या