Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची तळमळ असणारे


मुंबई : "गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरत आहे. महाराष्ट्र आज दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे, पाहिले कारण मुंबई आणि दुसरे या राज्याचे (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", अशा शब्दांत भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर (Georgis Gor) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गतिशील नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या' राष्ट्रीय परिषद २०२६'मध्ये ते बोलत होते.


हॉटेल ललित येथे आयोजित या राष्ट्रीय परिषदेत बोलताना अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर (Georgis Gor) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. आपण जगभरातील अनेक नेत्यांशी संवाद साधल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर आहे; एक म्हणजे मुंबई आणि दुसरे म्हणजे तुमचे अत्यंत डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची तळमळ असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस." भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात महाराष्ट्र केंद्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांचे संबंध एका नव्या उंचीवर पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



या परिषदेला उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी यांच्यासह भारत आणि अमेरिकेतील अनेक नामवंत गुंतवणूकदार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कामगिरीबद्दल (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.



महाराष्ट्र गुंतवणुकीचे डेस्टिनेशन - मुख्यमंत्री फडणवीस


यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संशोधन, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर आणि भक्कम पायाभूत सुविधांची परिसंस्था राज्यात उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ६६० बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला आणि १०.२ टक्के विकासदराने वाटचाल करणारा महाराष्ट्र हा देशातील तरुणाईचे प्रमुख आकर्षण आहे. भारताच्या एकूण डिजिटल पायाभूत सुविधांपैकी ६५ टक्के सुविधा महाराष्ट्रात असून, नवी मुंबईत विकसित होत असलेली 'मेडिसिटी' आणि डिजिटल परिसंस्थेमुळे अमेरिका व भारताच्या भागीदारीला नवे बळ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)




Comments
Add Comment

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या