Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत अनोखा आणि चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्यांच्या नसबंदीच्या नावाखाली झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा पोलखोल करण्यासाठी एक स्थानिक नेता थेट कुत्र्याचा मुखवटा घालून जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. या अनोख्या आंदोलनामुळे जनसुनावणीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.



कुत्र्याचा मुखवटा घालून आंदोलन




नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दीपक राठौर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही अनोखी क्लृप्ती लढवली होती. अंगावर माणसाचे कपडे आणि चेहऱ्यावर कुत्र्याचा मुखवटा अशा अवतारात ते कार्यकर्त्यांसह जनसुनावणीच्या ठिकाणी पोहोचले. सुरुवातीला तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवेश नाकारला. मात्र, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना आत येण्याची परवानगी दिली.



"नसबंदी करूनही मी ६ पोरांचा बाप झालो!"


जनसुनावणीत अधिकाऱ्यांसमोर पोहोचताच राठौर यांनी उपरोधिक भाषेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. "तुम्ही कागदावर दावा करताय की कुत्र्यांची नसबंदी झाली आहे, पण नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो," अशा शब्दांत त्यांनी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरून प्रशासकीय दाव्यांची चिरफाड केली. नसबंदीच्या नावाखाली केवळ निधी लाटला जात असून प्रत्यक्षात मात्र शहरात भटका प्राण्यांचा वावर भयानक वाढल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.



४० लाखांचा खर्च अन् १३ हजारांहून अधिक डॉग बाईट्स!


दीपक राठौर यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत खंडवा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा मोठा निधी खर्चूनही परिस्थिती जैसे थे असून कुत्र्यांची संख्या घटण्याऐवजी दुप्पट झाली आहे. गेल्या चार वर्षांत शहरात तब्बल १३ हजार २२५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नसबंदीच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि