Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश


मुंबई : समुद्रातील अपघात अथवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी 'वॉटर ॲम्ब्युलन्स' सेवा महत्त्वाची आहे. मुंबई महानगर प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले.


मंत्रालयात वॉटर अंब्युलन्सबाबत सूचना मरिन प्रा.लि. कंपनीमार्फत सादरीकरणानंतर मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वॉटर ॲम्ब्युलन्स प्रकल्पाची उभारणी, परिचालन आणि त्यामधील वैद्यकीय सुविधांबाबत आरोग्य विभागासोबत सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. त्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना मंत्री राणे यांनी केली. या बैठकीत प्रत्येक विभागाची भूमिका निश्चित करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील विविध रुग्णालयांपर्यंत नैसर्गिक जेटींच्या माध्यमातून पोहोचता येऊ शकते. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडील जेटी आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा या सेवेसाठी उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशासाठी वॉटर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपयुक्त ठरेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.


वॉटर ॲम्ब्युलन्सची खरेदी आणि परिचालनासाठी उपलब्ध पर्यायांचा संयुक्त बैठकीत विचार केला जाणार आहे. मोरा आणि एलिफंटा बेटांवरील वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगातही या सेवेच्या माध्यमातून मदत पोहोचविणे शक्य होईल. सर्व संबंधित विभागांना एकत्र आणून हा प्रकल्प पुढे नेण्याची कार्यवाही करावी, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.



फायदा काय होणार?


- मुंबईच्या आसपास प्रत्येक २४ तासांत तीनशेहून अधिक व्यापारी जहाजे असतात. या जहाजांवरील नाविकांसह मच्छीमार समुदायालाही आपत्कालीन परिस्थितीत या सेवेची मदत होऊ शकते. या माध्यमातून समुद्रात किंवा दुर्गम किनारी भागात उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविता येणार आहे.
- सध्या काही प्रसंगी हेलिकॉप्टरद्वारे रुग्णाला आणावे लागते आणि त्यासाठी वेळ लागू शकतो. अशावेळी वॉटर अंब्युलन्स हा उपयुक्त पर्याय ठरू शकतो. वॉटर ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचर, ऑक्सिजन, प्राथमिक उपचार, हृदयविकारविषयक सहाय्य अथवा अतिदक्षता सुविधांपैकी नेमक्या कोणत्या व्यवस्था असाव्यात, याबाबत आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला जाणार आहे.
- डॉक्टर आणि परिचारिकेची उपलब्धता तसेच आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ आणि उपकरणांची अंतिम रूपरेषाही आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

'पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका!' पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नागरिकांना संदेश

मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा