YouTube New Update : YouTube क्रिएटर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! आता व्हिडिओ सुरू होताच वाढणार...24 ऑगस्टपासून बदलणार नियम!

यूट्यूबवर व्हिडिओ (YouTube Video) तयार करणाऱ्या जगभरातील आणि राज्यातील लाखो क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या व्ह्यू काउंटिंग (View Counting) पद्धतीत क्रांतीकारक बदल करण्याची घोषणा केली आहे. येत्या २४ ऑगस्टपासून प्लॅटफॉर्मवरील लाँग-फॉर्म व्हिडिओ आणि शॉर्ट्स अशा दोन्ही फॉरमॅटसाठी एकच समान नियम लागू केला जाणार आहे. नवीन नियमानुसार, प्रेक्षकाने व्हिडिओवर क्लिक करून तो सुरू करताच पहिल्याच सेकंदाला त्याचा एक 'व्ह्यू' म्हणून नोंद केला जाईल. यापूर्वी व्ह्यू मोजण्यासाठी ठरावीक वॉच-टाईमची अट असायची, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.



या धोरणात्मक बदलामुळे क्रिएटर्सच्या एकूण व्ह्यूजची संख्या वेगाने वाढणार असून, त्याचा थेट फायदा त्यांना ब्रँड स्पॉन्सरशिप आणि कमर्शियल डील्स मिळवताना होणार आहे. प्लॅटफॉर्मवरील सर्व फॉरमॅटमध्ये एकसूत्रीपणा आणणे आणि क्रिएटर्सची खरी पोहोच ब्रँड्ससमोर अधिक पारदर्शकपणे मांडणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे यूट्यूबने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे 'यूट्यूब पार्टनर प्रोग्राम' (YPP) अंतर्गत होणाऱ्या नियमित कमाईवर अथवा मोनिटायझेशनच्या नियमांवर कोणताही थेट परिणाम होणार नाही. जरी या निर्णयामुळे व्ह्यूजचा आकडा वाढणार असला, तरी डिजिटल विश्वात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चुकून क्लिक झालेल्या किंवा अवघ्या काही सेकंदांत बंद केलेल्या व्हिडिओंवरही आता व्ह्यू काउंट मिळणार असल्याने 'सरासरी वॉच टाईम' (Average Watch Time) घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मोठे ब्रँड्स प्रायोजकत्व देताना केवळ एकूण व्ह्यूज न बघता व्हिडिओ किती वेळ पाहिला गेला (रिटेन्शन रेट) हेदेखील तपासतात. त्यामुळे व्ह्यूज वाढले तरी वॉच टाईम खराब झाल्यास स्पॉन्सरशिपच्या दरावर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि