Lucknow Crime News : पत्नीला बँकेबाहेर बोलावले अन् गोळी झाडली; व्हाट्सअँप स्टेटसने खळबळ उडवली

लखनौमधील पॉश गोमतीनगर भागात गुरुवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेल्या मानस वाजपेजी या कर्मचाऱ्याने आधी आयसीआयसीआय बँकेत कार्यरत असलेल्या आपल्या पत्नीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच घरी जाऊन स्वतःच्या बहीणीवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःलाही गोली झाडून आत्महत्या केली. तौतूबेर प्रज्ञा मिश्रा या हत्याकांडात ठर झाली आहे. (Lucknow Crime News)


मानस वाजपेयी याने गुरुवारी दुपारी ICICI बँकेत असिस्टंट मॅनेजर / रिलेशनशिप मॅनेजर असलेल्या पत्नी दिव्या मिश्रा हिला फोन करून बँकेबाहेर बोलावले घेतले. काही वेळ त्यांच्यात संभाषण झाले आणि अचानक मानसने तिच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत दिव्या जागीच कोसळली. पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मानस तातडीने २ किमी अंतरावर असलेल्या हुसडिया भागातील आपल्या घरी पोहोचला. खोलीचा दरवाजा आतून बंद करून त्याने आपली बहीण सीमा वाजपेयी हिच्यावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्य संपवले. (Lucknow Crime News)


या थरारक कृत्यापूर्वी मानस वाजपेयीने आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. "मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे, कारण तिने मला फसवले होते. आता मला स्वतःला आणि माझ्या बहिणीलाही संपवायचे आहे. तिची बहीण प्रज्ञा आणि तिचा पती भरत यादव यांना सर्व काही माहिती आहे." (Lucknow Crime News)


प्राथमिक माहितीनुसार, मानस आणि दिव्या यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. दिव्याने एका वर्षापूर्वी पतीविरोधात न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि ती आलमबाग परिसरात स्वतंत्र राहत होती. घटनेची माहिती मिळताच गोमतीनगर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. (Lucknow Crime News)

Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.