Vande Mataram Controversy : काँग्रेसने 'वंदे मातरम'बाबत मंजूर केलेला ठराव संविधानविरोधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरही साधला निशाणा


मुंबई : काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताबाबत मंजूर केलेला ठराव पूर्णपणे संविधानविरोधी असून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय अमान्य करणे हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.


काँग्रेस पक्षाने 'वंदे मातरम'बाबत नुकताच एक ठराव मंजूर करत या गीताची दोन कडवीच गाण्याबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आता देशात ब्रिटिशांचे राज्य नसून, स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला प्रत्येक निर्णय हा संवैधानिक असतो. मात्र, संसदेचा निर्णय मानणार नाही आणि गुलामीची परंपरा कायम ठेवू, असा पवित्रा काँग्रेस घेत असल्याचे यातून दिसून येते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.



काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. राहुल गांधी यांनी सरसकट सर्वसामान्य तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता, मात्र माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्याद्वारे संचालित महाविद्यालयांमधील मुलींचेच रजिस्ट्रेशन करून त्यांना या कार्यक्रमात आणले जात आहे, असा दावा त्यांनी केला.


यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतच्या निकषांचा पुनरुच्चार केला. योजनेच्या लाभासाठी करण्यात आलेल्या छाननीमध्ये आयकर भरणाऱ्या कुटुंबांचे अर्ज नियमात बसत नसल्याचे स्पष्ट झाले असून, पात्र आणि शंभर टक्के व्हेरिफाईड ठरलेल्या महिलांना सरकार असेपर्यंत नियमितपणे लाभ मिळत राहील, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण