Jalgaon : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ कार, ॲपे रिक्षा आणि दुचाकीची तिहेरी धडक झाली. या अपघातात मध्य प्रदेशातील ४५ वर्षीय राजेश चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. (Jalgaon Accident News)



भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टोयोटा कार भुसावळहून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होती. यावेळी कारने पुढे असलेल्या दुचाकीला कट मारला. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पुढे जाणाऱ्या ॲपे रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपे रिक्षातील राजेश चव्हाण आणि दुर्गेशकुमार, तसेच दुचाकीवरील समाधान डोळे आणि मनीषा डोळे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी राजेश चव्हाण यांना मृत घोषित केले. (Jalgaon Accident News)



वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू


अपघाताची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर कार आणि ॲपे रिक्षाचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. याप्रकरणी वरणगाव पोलिसांकडून (Varangaon Police) पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. पोलिसांकडून काही काळापूर्वी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे अर्थात ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (Jalgaon Accident News)



दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू


दुसरीकडे जळगाव शहरातून गेलेल्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, बांभोरी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडलीय. योगेश महाजन (रा. इच्छदेवी चौक परिसर जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर शहरातील वाढत्या अवजड वाहतुकीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टीव्हा वाहनावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने यात योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ टँकरच्या धडकेत भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यात आले नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने