मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. हळद, मिरची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, खसखस यांसह विविध मसाले आणि त्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग, अर्क काढलेले मसाले किंवा अन्य परकीय पदार्थ मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.


राज्यातील काही ठिकाणी मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. मसाल्यांमध्ये भुसा, कृत्रिम रंग किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन करणे आवश्यक असेल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. नव्या नियमांनुसार, मसाल्यांची विक्री वैध परवान्याशिवाय करता येणार नाही. सुट्या मसाल्यांच्या विक्रीवरही निर्बंध घालण्यात आल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. मसाल्यांची साठवणूक स्वच्छ ठिकाणी करणे आवश्यक असून, उत्पादन आणि वाहतुकीदरम्यानही स्वच्छतेचे निकष पाळावे लागतील. मसाल्यांच्या प्रक्रियेत प्रतिबंधित इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यासही मनाई आहे.



मसाल्यांचे उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना हे नियम बंधनकारक असतील. नियमांचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई आणि कायद्यातील तरतुदींनुसार कारावासाची शिक्षा होऊ शकते. भेसळ रोखण्यासाठी आणि अन्नपदार्थांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यात ‘सेफ फूड, सेफ ड्रग्स’ अभियान राबविण्यात येत असल्याचेही मुंढे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :