Chhattisgarh : छत्तीसगडच्या IGKV पेपरफुटी प्रकरणी सहा जणांना अटक

रायपूर : इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील (Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya) पेपरफुटी प्रकरणी एक प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी अशा एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील प्राध्यापक खासगी महाविद्यालयात कार्यरत आहे, अशी माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी दिली. पेपरफुटी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.


पोलीस आणि सायबर तज्ज्ञ संयुक्तपणे पेपरफुटी प्रकरणी तपास करत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीआधारे तपास पथकाने खासगी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका प्राध्यापकाला तसेच पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात २० ऑगस्ट रोजी बीएससी कृषी कीटकशास्त्र परीक्षेआधी पेपरफुटी झाली. दुर्ग येथील भारती कॉलेजमधून पेपर फुटला. पेपरफुटीचा संशय येताच तपास करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचा समावेश असलेले एक संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने अनेक विद्यार्थ्यांची तसेच परीक्षा आयोजन करणाऱ्या यंत्रणेतील निवडक अधिकारी - कर्मचारी यांची चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.


विद्यापीठातील एक प्राध्यापक एका सीलबंद पाकिटातून प्रश्नपत्रिका विद्यापीठातून बाहेर नेण्यासाठी जबाबदार होते. त्यांनी पाकिटाच्या तळाशी एक लहान छिद्र करून, संपूर्ण प्रश्नपत्रिका स्कॅन करण्यासाठी त्यात एक एंडोस्कोपिक कॅमेरा घातला, हाताने १५ प्रश्न उतरवून घेतले आणि हे उतरवून घेतलेले प्रश्न विद्यार्थ्यांना विकले. ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती, त्यांच्यापर्यंत पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे गुन्हे शाखेचे डीसीपी स्मृतीक राजनाला यांनी सांगितले. आरोपीने प्रश्न हजारो रुपयांना विकल्याची कबुली दिल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही

OBC Cabinet Sub Committee : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर ३ मंत्र्यांचा बहिष्कार

- छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश मुंबई : ओबीसी महामंडळाला योग्य प्रमाणात निधीची तरतूद केली

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त