Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला घरासमोर सुरू असलेल्या कार्यक्रमात भरधाव प्रवासी बस घुसल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये बहादुर महतो, संजय कुमार, भोला दुबे, देवेंद्र दुबे आणि चांगुर राम यांचा समावेश आहे.



ट्रकला धडक टाळताना बसवरील नियंत्रण सुटलं


मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र दुबे यांच्या मुलाचा सहावा वाढदिवस असल्याने शुक्रवारी रात्री त्यांच्या घरासमोर आर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


दरम्यान, गोरखपूरहून बेतियाकडे जाणारी प्रवासी बस बागाहा-लौरिया मुख्य मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. यावेळी समोर आलेल्या ट्रकला धडक टाळण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या आर्केस्ट्राच्या कार्यक्रमात घुसली.


बसने लोकांना धडक दिल्याने घटनास्थळी एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून बेतिया जीएमसीएच रुग्णालयात दाखल केले.



संतप्त जमावाकडून बस आणि ट्रकची तोडफोड


अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी बस आणि ट्रकची तोडफोड केली. आर्केस्ट्रासाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या आणि स्पीकरचेही नुकसान करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नरकटियागंजचे एसडीपीओ जयप्रकाश सिंह घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला शांत केले.


पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास सुरू असून बस आणि ट्रकच्या चालकांची भूमिका तपासली जात आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि