UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती, प्रतिबंध आणि उपचार यासाठी पदवी व पदव्युत्तर स्तरावर दोन क्रेडिटचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. कोणत्याही विषयाच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत हा अभ्यासक्रम घेता येणार आहे.


विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित अभ्यासक्रमाचा मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यावर विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, विषयतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून २६ ऑगस्टपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम अनिवार्य नसला तरी तो पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन अतिरिक्त क्रेडिट पॉइंट्स मिळणार आहेत. हे क्रेडिट त्यांच्या पदवीसाठी ग्राह्य धरले जाणार असून, भविष्यातील रोजगाराच्या संधींमध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो.



‘सार्वजनिक आरोग्य आणि व्यवस्थापन’ या प्रस्तावित अभ्यासक्रमात अमली पदार्थांचे व्यसन म्हणजे काय, त्याचे परिणाम, व्यसनापासून बचावाचे उपाय, व्यसनाधीन व्यक्तीची ओळख आणि त्यावर लक्ष ठेवण्याच्या पद्धती यांचा समावेश आहे. तसेच अमली पदार्थांशी संबंधित देशातील कायदे, सरकारी कार्यक्रम आणि व्यसनमुक्तीच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या मोहिमेत तरुणांचा सहभाग कसा वाढवता येईल, यावरही अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.


राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अतिरिक्त क्रेडिट मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. हे क्रेडिट विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक क्रेडिट बँकेत जमा करता येणार आहेत. पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमातील आवश्यक क्रेडिट पूर्ण करताना त्यांचा उपयोग होऊ शकतो. सामान्य पदव्युत्तर पदवीसाठी १२० क्रेडिट पॉइंट्स आवश्यक असतात. साधारण १५ तासांच्या वर्गातील अध्यापनासाठी किंवा ३० तासांच्या प्रयोगशाळेतील कामासाठी एक क्रेडिट मिळते.


अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात देशभर १०० आठवड्यांची मोहीम सुरू असताना युजीसीने हा उपक्रम हाती घेतला आहे. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या अमली पदार्थांच्या संकटाबाबत चिंता व्यक्त करत त्याविरोधात सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली होती. युजीसीनुसार, प्रस्तावित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि