Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी मोदी यांनी पूर आणि नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत नेपाळच्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केल्या. या कठीण प्रसंगी भारतातील जनता नेपाळमधील नागरिकांसोबत ठामपणे उभी असल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी नेपाळला बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ती सर्व मानवीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भारतीय पथके नेपाळमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने बचाव आणि मदतकार्याला सहकार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारत सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आवश्यक जीवनावश्यक आणि मदत सामग्री लवकरात लवकर नेपाळमध्ये पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.



पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्याशी संवाद साधला आणि नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दरम्यान, नेपाळमधील तिबेट सीमेजवळील रसुवा जिल्ह्यात बुधवारी भोटे कोशी नदीला अचानक पूर आला. या पुरामुळे अनेक गावांसह रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. तिबेटच्या दिशेने हिमनदी परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढणे किंवा हिमस्खलन होणे, ही या पुरामागील संभाव्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे.



स्थानिक माहितीनुसार या दुर्घटनेत किमान ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला असून ३८० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये सुमारे १०५ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांनी मदतीसाठी +९७७ ९८५ १३१ ६८०७ आणि +९७७ ९७० ९१० ७५०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पूरग्रस्त भारतीय नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहे.

Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर