US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. नवीन जागतिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आल्याने व्हिसा सेवांच्या काही अपॉइंटमेंट्स पुढे ढकलण्यात येत आहेत. (US Visa Interview)


रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली. जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये कन्स्युलर अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे व्हिसा सेवांच्या अपॉइंटमेंटच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत. (US Visa Interview)



ट्रम्प प्रशासनाची इमिग्रेशनवर कडक भूमिका :


डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने इमिग्रेशन धोरण अधिक कठोर केले आहे. अवैध स्थलांतर रोखण्यासोबतच व्हिसा आणि ग्रीन कार्ड रद्द करणे, तसेच विविध कारणांवरून अर्ज नाकारण्याची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे. अमेरिकी प्रशासनाच्या मते, या कठोर धोरणाचा उद्देश देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे हा आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या काही इमिग्रेशन धोरणांना न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (US Visa Interview)



व्हिसा अधिकाऱ्यांना कोणते प्रशिक्षण?


रॉयटर्सच्या माहितीनुसार, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने या प्रशिक्षणाचा कालावधी किंवा त्याबाबतची सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, या प्रशिक्षणाचा उद्देश कन्स्युलर अधिकाऱ्यांना व्हिसा अर्जदारांची अधिक सखोल तपासणी करण्यासाठी तयार करणे असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेत सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांची ओळख पटवणे आणि सर्व व्हिसा अर्जांची एकसमान व सखोल पद्धतीने तपासणी करणे, हे या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. (US Visa Interview)



आधीच इंटरव्ह्यू ठरलेल्यांचे काय?


व्हिसा इंटरव्ह्यूची तारीख आधीच निश्चित झालेल्या काही इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडून ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या ईमेलमध्ये संबंधित अपॉइंटमेंटची तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, नवीन तारीख नंतर कळवली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, व्हिसा अपॉइंटमेंटमध्ये बदलाची बातमी सर्वप्रथम फायनान्शियल टाइम्सने दिल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिका जाण्याचे नियोजन करणाऱ्या व्हिसा अर्जदारांसाठी पुढील काळात प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे. (US Visa Interview)

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात