Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अमित ठाकरे यांनी प्रथम स्वतःचे कर्तृत्व आणि राजकीय आवाका तपासावा, त्यानंतर भाजप नेत्यांवर टीका करावी, असा टोला मुंबई भाजपचे प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम यांनी लगावला. (Aniket Nikam)


अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्याचा आरोप करत निकम यांनी त्यावर आक्षेप घेतला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीने जनाधारातून निवडून आलेल्या आमदारावर टीका करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. “अमित ठाकरे हे राजकारणात अद्याप नवखे आहेत. त्यामुळे त्यांनी कोणावर टीका करण्यापूर्वी स्वतःचा राजकीय अनुभव आणि कर्तृत्व तपासावे,” असे निकम म्हणाले.







‘ठाकरे आडनावाव्यतिरिक्त स्वतःचे कर्तृत्व काय?’


अमित ठाकरे यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत निकम यांनी, “ठाकरे हे आडनाव वगळता अमित ठाकरे यांचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे, याचा त्यांनी विचार करावा,” अशी टीका केली. कोणत्याही विषयावर बेधडक विधाने करण्याची सवय आता अमित ठाकरेंनाही लागल्याचे दिसत असल्याचे निकम यांनी म्हटले. तसेच राजकारणातील आपला अनुभव आणि जनाधार लक्षात घेऊनच नेत्यांनी इतरांवर टीका करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.  (Aniket Nikam)

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन