Jalgaon : सौंदर्य प्रसाधने घेताना जरा जपूनच ! जळगावात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Jalgaon FDA Raid : जळगाव जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाने अमळनेर आणि जळगाव शहरात कारवाई केलीय. या कारवाईत दोन ठिकाणांहून तब्बल 1 लाख 6 हजार 325 रुपये किमतीचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. (Jalgaon News)



सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त


अमळनेरच्या रवींद्रनगर परिसरात प्रियदर्शनी रजाळे यांच्या मालकीच्या ठिकाणी पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने आढळून आली. त्यांची एकूण किंमत 72 हजार 392 रुपये असून हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर जळगाव शहरातील महाबळ परिसरात राशी तळरेजा यांच्या मालकीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. येथे सौंदर्य प्रसाधनांसोबतच त्यांचे पॅकिंग आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्यही आढळले. या ठिकाणाहून 33 हजार 933 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान क्रीम, पावडर आणि जेल स्वरूपातील विविध उत्पादने आढळली. काही उत्पादनांवर लेबल होते, तर काही उत्पादने विनालेबल असल्याचे समोर आले. याशिवाय प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि इतर पॅकिंग साहित्यही जप्त करण्यात आले. (Jalgaon News)



प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई


संबंधित ठिकाणी वैध उत्पादन परवाना नसतानाही सौंदर्य प्रसाधनांचा साठा, उत्पादन आणि पॅकिंग केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. काही उत्पादनांची आवश्यक गुणवत्ता तपासणी न करताच विक्री होत असल्याचेही तपासणीत आढळले. त्यामुळे जप्त केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेचीही तपासणी केली जात आहे. जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधनांपैकी काही नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांमधील घटक, उत्पादनाची गुणवत्ता आणि नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Jalgaon News)



सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना काळजी घ्या


ही कारवाई जिल्ह्याचे सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार यांच्या नेतृत्वाखाली क. र. पाटील आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केली.दरम्यान, नागरिकांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनकडून करण्यात आले आहे. उत्पादनाच्या लेबलवर उत्पादकाचे नाव व पत्ता, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदतबाह्यता तारीख यांसारखी आवश्यक माहिती आहे की नाही, हे तपासावे. विनालेबल किंवा अस्पष्ट माहिती असलेली उत्पादने खरेदी करू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी