PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या चार दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दौऱ्यापूर्वीच्या निवेदनात मोदींनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यामुळे मध्य आशियातील भारताची सामरिक भागीदारी अधिक मजबूत होईल आणि या प्रदेशासोबतचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.



पंतप्रधानांनी नमूद केले की, अलिकडच्या वर्षांत भारत-उझबेकिस्तान सामरिक भागीदारीने लक्षणीय प्रगती केली आहे. ते म्हणाले की, ते उझबेक राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्यासोबत व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर, तसेच विकसित भारत आणि तरुण उझबेकिस्तानच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यावर चर्चा करतील. मोदी म्हणाले की, ते शास्त्री स्मारक आणि ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीज येथील महात्मा गांधी केंद्रालाही भेट देतील. ते म्हणाले की, ही केंद्रे दोन्ही देशांमधील मजबूत सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहेत.



पंतप्रधानांनी सांगितले की, ते किर्गिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून बिश्केक येथे होणाऱ्या २६ व्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.  मोदी म्हणाले की, सुरक्षा, संपर्क आणि संधी यांवर आधारित प्रदेशासाठी भारताची दूरदृष्टी पुढे नेण्यास आणि दहशतवाद, फुटीरतावाद व अतिरेकीपणापासून मुक्त प्रदेशासाठी SCO च्या इतर सदस्य राष्ट्रांसोबत काम करण्यास ते उत्सुक आहेत. त्यांनी सांगितले की, ही आव्हाने शेजारील देशांसाठी आणि शांतता व स्थिरतेसाठी सतत धोका निर्माण करत आहेत.पंतप्रधानांनी सांगितले की, किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यादरम्यान ते अध्यक्ष सादिर झापारोव्ह आणि SCO च्या इतर नेत्यांना भेटतील, तसेच ६ व्या जागतिक नोमॅडिक खेळांच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहतील.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात