Trump Venezuela Oil Deal : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यावर अमेरिकेचं वर्चस्व; पेट्रोलच्या किमती कमी होणार?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या ऊर्जा कराराची घोषणा करत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरलहून अधिक प्रमाणित तेलसाठ्यावर बहुमत नियंत्रण मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हा करार ‘जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Trump Venezuela Oil Deal)


ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, या करारामुळे अमेरिकेचा तेलसाठा दुपटीपेक्षा अधिक वाढणार असून देशांतर्गत तेलाचा पुरवठाही वाढेल. परिणामी भविष्यात अमेरिकेतील पेट्रोलच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे. (Trump Venezuela Oil Deal)



सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रम्प यांची घोषणा :


ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या कराराची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांच्या सहकार्याने हा करार करण्यात आला आहे. खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून हा करार झाला असून त्यासाठी अमेरिकन करदात्यांवर कोणताही खर्च पडला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हा करार अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासोबतच व्हेनेझुएलाच्या आर्थिक विकासालाही चालना देईल, असे त्यांनी म्हटले आहे. (Trump Venezuela Oil Deal)



मादुरो सत्तेतून हटल्याने समीकरण बदललं :


व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो सत्तेतून हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मोठे बदल झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशानुसार झालेल्या अमेरिकी लष्करी कारवाईदरम्यान मादुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकेत आणण्यात आल्याचा उल्लेख या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. मादुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि नार्को-टेररिझमशी संबंधित आरोप करण्यात आले होते. त्यांच्या सत्तेतून हटवल्यानंतर अमेरिकन ऊर्जा कंपन्यांना व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात पुन्हा संधी मिळण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आले होते. (Trump Venezuela Oil Deal)



अमेरिकेत ऊर्जा संकटाची चिंता :


अमेरिकेत पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढत आहे. इराणमधील युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता कायम असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे देशांतर्गत इंधन पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्येही २०२६ च्या सुरुवातीपासून मोठी घट झाल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प प्रशासन या कराराकडे ऊर्जा पुरवठा वाढवणारे आणि देशांतर्गत बाजार स्थिर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहत आहे. (Trump Venezuela Oil Deal)



व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यांपैकी एक :


व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक सिद्ध तेलसाठा असलेल्या देशांपैकी एक आहे. अमेरिकेच्या Energy Information Administration (EIA) नुसार, व्हेनेझुएलाकडे सुमारे ३०३ अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. हा जागतिक तेलसाठ्याच्या सुमारे १७ टक्के असल्याचे सांगितले जाते. मात्र, खराब पायाभूत सुविधा, आर्थिक संकट आणि अनेक वर्षांपासून गुंतवणुकीचा अभाव यामुळे व्हेनेझुएलाची तेल उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. त्यामुळे एवढा मोठा तेलसाठा असूनही जागतिक तेल उत्पादनात व्हेनेझुएलाचा वाटा तुलनेने कमी आहे. (Trump Venezuela Oil Deal)



अमेरिका-व्हेनेझुएला संबंधांना नवं वळण?


ट्रम्प यांच्या मते, हा करार केवळ तेल आणि ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित नाही. या करारामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील, असा त्यांचा दावा आहे. अमेरिकेला दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मिळण्यासोबतच व्हेनेझुएलामध्ये गुंतवणूक आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. (Trump Venezuela Oil Deal)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे