Congress Leader Murder : फिरोजपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, पोलीस तपास सुरु

फिरोजपूर : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरप्रीत सिंग गोपी असे मृत काँग्रेस नेत्याचे नाव आहे. ते आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून जात असताना कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Punjab Crime)


ही घटना 29 ऑगस्ट रोजी पंजाबमधील ममडोट शहरात घडली. गुरप्रीत सिंग गोपी हे सहकारी हरप्रीत यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. त्यांचे काही मित्रही कारमधून त्यांच्या मागे येत होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. काही अंतर गेल्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवर गोळीबार केला. यात गुरप्रीत सिंग गोपी यांचा मृत्यू झाला.


हल्लेखोरांनी त्यांच्या मित्रांच्या कारवरही गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. (Congress Leader Murder)



पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा संशय आहे. दोन गटांमधील वादातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. तसेच स्थानिक राजकीय किंवा निवडणुकीशी संबंधित वादाचा या हत्येशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. (Gurpreet Singh Gopi)


फिरोजपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक भूपिंदर सिंग सिद्धू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची ओळख पटली आहे. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून त्यांच्या संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ( Political Crime)


Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि