Mohan Bhagwat : ‘धर्म वेगळे असू शकतात, पण मानवता एकच’; मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधून मोहन भागवत यांचा एकतेचा संदेश

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधून जगाला एकता आणि मानवतेचा संदेश दिला. ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. ‘द अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या वेळी मोहन भागवत यांनी विविधता, एकता आणि मानवतेवर भाष्य केले. “धर्म वेगळे असू शकतात, पण भावना एकच असते. आपण दिसायला वेगवेगळे असलो तरी मुळात एकच आहोत. भारताच्या DNA मध्ये एकता आहे. आपण कसा विचार करतो, हे आपले भवितव्य ठरवते. आपण एकच आहोत, हे स्वीकारले पाहिजे,” असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat)



‘विविधतेत एकता’ भारताच्या DNA मध्ये :


अमेरिका आणि भारताच्या सामाजिक रचनेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, अमेरिकेबाबत बोलताना ‘प्लुरॅलिझम’ म्हणजेच बहुविधता हा शब्द वारंवार वापरला जातो. तर भारताच्या बाबतीत ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना अधिक ठळकपणे समोर येते. भारतातील नागरिकांच्या DNA मध्ये विविधता आणि एकता या दोन्ही गोष्टी रुजलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat)



‘नर नारायण होऊ शकतो’ :


मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की, राष्ट्र केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नसते. विश्वाच्या व्यापक रचनेत प्रत्येक राष्ट्राची विशिष्ट भूमिका आणि जबाबदारी असते. स्वामी विवेकानंद यांनीही प्रत्येक देशाचे एक विशिष्ट ध्येय असल्याचे सांगितले होते. “नर चाहे तो नारायण बन सकता है,” असे सांगत त्यांनी मानवाच्या क्षमतेवर भर दिला. जगात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी माणूसच जबाबदार असतो, असेही त्यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat)



‘विचार कसा करता, हे महत्त्वाचे’ :


मानवाला विचार करण्याची क्षमता मिळाली आहे आणि ही मोठी देणगी आहे. मात्र केवळ विचार करण्याची क्षमता असणे पुरेसे नाही, तर आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो हे अधिक महत्त्वाचे आहे, असे भागवत यांनी सांगितले. “जर तुम्ही योग्य पद्धतीने विचार केला, तर तुम्ही देवाच्या जवळ जाता. चुकीच्या पद्धतीने विचार केला, तर तुम्ही प्राण्यांच्या जवळ जाता. काही चुकीचे वाटत असेल, तर सत्याचा शोध घ्या,” असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat)



जगाला एकतेचा संदेश देणे हे भारताचे काम :


भारताची भूमिका स्पष्ट करताना मोहन भागवत म्हणाले की, आपण सर्वजण एकच आहोत, हा संदेश जगाला देणे हे भारताचे काम आहे. विविधता ही एकतेला कमकुवत करत नाही, उलट ती एकतेचे सौंदर्य वाढवते, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mohan Bhagwat)



भौतिक सुख कायम समाधान देत नाही :


भौतिक सुखाच्या मागे धावण्याबाबतही भागवत यांनी उदाहरण देत भाष्य केले. न्यूयॉर्कमधील डोनटचे उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ कितीही आवडत असला तरी त्याची एक मर्यादा असते. काही काळानंतर त्याच पदार्थाचा आनंद कमी होतो आणि पुन्हा त्याच गोष्टीची इच्छा निर्माण होते. भौतिक सुख हे तात्पुरते असते आणि त्यातून कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, असा संदेश त्यांनी या उदाहरणातून दिला. माणसाने केवळ भौतिक सुखाच्या मागे न धावता जीवनातील खऱ्या समाधानाचा आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat)


Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे