Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळ्यातील ग्राहकांना विकायचे, असा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील जानवे येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग (Food and Drug Administration Department) आणि अमळनेर पोलिसांनी (Amalner Police) रविवारी संयुक्त कारवाई करत या भेसळयुक्त दुधाच्या धंद्याचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)
Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद ...
‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील जानवे ते इंदापिंप्री (Janave to Indapimpri) रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये, गायी-म्हशींच्या गोठ्याच्या आड भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी महेश दिलीप पाटील (वय २७, रा. जानवे) हा गायीच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्यामध्ये सोयाबीन तेल मिसळताना रंगेहाथ आढळून आला. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जात होते. त्यानंतर हेच भेसळयुक्त दूध (Adulterated milk) ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे समोर आले. (Jalgaon Crime News)
Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे. लेकींना शिकवायचं स्वप्न असलेल्या एका ...
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फिर्याद
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे (वय ३०) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २७(३), ३१(१), ३१(२), ५९ तसेच नवीन भारतीय न्याय संहितेतील BNS कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. समृद्धी ...
४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कारवाईदरम्यान ४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महेश पाटील याला रविवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत. दरम्यान, मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुग्ध व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.






