Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई पोलिस असल्याचे भासवत पीडित अधिकाऱ्याला १२ दिवस घरातच अटक (हाउस अरेस्ट) करून ठेवले. या कालावधीत त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संवाद साधला आणि बँक खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेमार्फत तपासण्याची गरज असल्याचे सांगत पैसे हस्तगत केले. नाशिकमधील वयोवृद्ध मॅनेजरला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल ८९ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सातपूर येथील एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कार्यरत असलेल्या या वयोवृद्ध अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik City Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू खरातने महिलांवर अत्याचार तसेच आर्थिक ...
नेमकं काय घडलं ?
समोर आलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून पीडित मॅनेजरशी संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून जम्मू येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे, असा दावा आरोपींनी केला. हे खाते दहशतवादी आदिल गौरीने मनी लाँड्रिंगसाठी (Money Laundering) वापरले असून, या गुन्ह्यात तुमचाही सहभाग आहे, अशी भीतीही त्यांना दाखवण्यात आली. यानंतर आरोपींनी मॅनेजरला तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तसेच स्थावर मालमत्तेची माहिती द्यावी लागेल, असे सांगितले. तसेच बँक खात्यातील सर्व रकमेची आरबीआयमार्फत तपासणी केली जाणार असल्याचे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’खाली ठेवल्याचा बनाव करण्यात आला. अटकेची आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवल्याने मॅनेजर आरोपींच्या जाळ्यात अडकले. आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ८९ लाख ९९ हजार रुपये वर्ग केले. १७ ऑगस्ट २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यामुळे मॅनेजरचे बँक खाते जवळपास रिकामे झाले.
Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद ...
पुण्यातील खात्यांमधील रक्कम फ्रीज
या प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मॅनेजरने वर्ग केलेली रक्कम पुणे आणि राजस्थानमधील विविध बँक खात्यांमध्ये गेल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पुण्यातील दोन संशयास्पद बँक खाती फ्रीज केली आहेत. या खात्यांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अडकली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडित मॅनेजरला त्यांची रक्कम परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. समृद्धी ...
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी बीएनएस कलम ३१८(४), २०४, २०५, ३५१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणतीही पोलीस यंत्रणा, एटीएस किंवा सीबीआय फोन अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






