काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक गावे, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली येथील कृषी विकास बँकेच्या पुरात बुडालेल्या शाखेतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षित बाहेर काढण्यात आली आहे. (Nepal Floods)
पूर ओसरल्यानंतर बँकेतील मौल्यवान वस्तू सुरक्षित करण्यासाठी पोलीस आणि संबंधित पथकाने सुमारे आठ तास विशेष बचाव मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान सुमारे ५० कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने, जवळपास दीड कोटी नेपाळी रुपये रोख, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या. बँकेतील महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. (Nepal Floods)
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या ...
बँकेत पोहोचणेही होते आव्हानात्मक :
भोटेकोशी नदीच्या पुरामुळे बँकेची त्रिशूली-ढुंगे शाखा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. पाणी, चिखल आणि ढिगाऱ्यामुळे बँकेतील लॉकर तसेच इतर भागांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले होते. अशा परिस्थितीत बचाव पथकाने जोखीम पत्करून बँकेच्या आत प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू एक-एक करून बाहेर काढल्या. सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बँकेतील मोठ्या प्रमाणातील संपत्ती सुरक्षित करण्यात यश आले. (Nepal Floods)
नेपाळमध्ये महापुरामुळे मोठं नुकसान :
२६ ऑगस्टपासून भोटेकोशी आणि त्रिशूली नदी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक भागांतील संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली असून बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ताज्या अहवालांनुसार मृतांचा आकडा ७८०च्या पुढे गेला असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत. (Nepal Floods)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ...
पूरग्रस्त भागांमध्ये नेपाळी लष्करासह भारत आणि चीनमधील विशेष बचाव पथकेही मदतकार्य करत आहेत. विशेषतः जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम वेगाने सुरू आहे. (Nepal Floods)






