नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अफगाणिस्तानात एकापाठोपाठ तीन भूकंपांची नोंद झाली. त्याचवेळी भारतातील जम्मू-कश्मीर आणि सिक्कीममध्येही भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS)च्या माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता २.४ ते ४.४ रिश्टर स्केलदरम्यान होती. (Earthquake News)
अफगाणिस्तानात सलग तीन भूकंप :
NCSच्या नोंदीनुसार, अफगाणिस्तानात पहिला भूकंप रात्री १ वाजून ६ मिनिटांनी झाला. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याची खोली १३२ किलोमीटर होती. यानंतर पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याची खोली १२७ किलोमीटर होती आणि त्याचे केंद्र फैजाबादच्या आग्नेय दिशेला ९९ किलोमीटर अंतरावर होते. (Earthquake News)
नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात झाला. किनवट ...
अवघ्या काही मिनिटांनी, ३ वाजून ३१ मिनिटांनी आणखी एक भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी असून, त्याचे केंद्र काबूलच्या पूर्वेला सुमारे १०५ किलोमीटर अंतरावर होते. (Earthquake News)
जम्मू-कश्मीरमध्येही भूकंप :
भारतामध्ये जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमध्ये रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाची खोली ६ किलोमीटर होती. NCSच्या नोंदीनुसार, भूकंपाचे केंद्र पहलगामच्या आग्नेय दिशेला सुमारे ९४ किलोमीटर अंतरावर होते. (Earthquake News)
पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण असतानाही पावसाच्या सरी गायब ...
सिक्कीममध्ये ३.९ रिश्टर स्केलचा धक्का :
मध्यरात्रीच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीती :
मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांची झोपही या हादऱ्यांमुळे मोडली. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या भूकंपांमुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. (Earthquake News)






