Tuesday, September 1, 2026

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण असतानाही पावसाच्या सरी गायब झाल्याने कमाल तापमानाचा पारा चढला आहे. मात्र, आता पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Pune Rain Alert)

पुण्यात पुन्हा पावसाची हजेरी?

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसा उकाडा जाणवत असून वातावरणातील दमटपणाही वाढला आहे. आता पावसाचे पुन्हा आगमन होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Pune Rain Alert)

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत पुणे शहर आणि लगतच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. पावसाच्या पुनरागमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पुणेकरांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवणे योग्य ठरणार आहे. (Pune Rain Alert)

महाराष्ट्रात संमिश्र हवामानाचा अंदाज :

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात संमिश्र हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Pune Rain Alert)

पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पिकांवरील फवारणीचे नियोजन करताना स्थानिक हवामान परिस्थितीचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Pune Rain Alert)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >