Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने चक्क तालुक्यातील (Peth Taluka) हरणगाव शिवारातील एका घरात प्रवेश केल्याची थरारक घटना घडली आहे. मात्र, घरातील कुटुंबीयांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे चार तासांच्या थरारानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश आले आहे.(Nashik News)
Nashik : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय चांदवड शहरातील नागरिकांना आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७५ वर्षीय आजीची दोन ...
नेमकं प्रकरण काय ?
सुभाष रघुनाथ भरसट हे हरणगाव शिवारातील मळ्यात राहतात. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एक बिबट्या त्यांच्या थेट घरात शिरला. विशेष म्हणजे घरातील हालचालींमुळे बिबट्याची चाहूल लागताच भरसट कुटुंबीय सुरुवातीला घाबरले मात्र नंतर ही परिस्थिती त्यांनी मोठ्या धैर्याने हाताळली. कुटुंबीयांनी सावधपणे घराचे दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद केल्या. त्यामुळे बिबट्या घरातच बंदिस्त झाला आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (Nashik News)
Nashik : डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र केल्या आहेत. ...
अन् चार तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
घडलेल्या घटनाक्रमाबाबत माहिती मिळताच हरणगावच्या सरपंच पल्लवी भरसट यांनी तातडीने वन विभागाशी (Forest Department) संपर्क साधला. माहिती मिळताच ननाशी वनपरिक्षेत्रातील महाजे राऊंडचा वन स्टाफ आणि नाशिकची विशेष रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने मोहीम राबवत पहाटे साडेचार वाजता बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात डांबले.बिबट्या सुखरूप जेरबंद झाल्याने भरसट कुटुंबीयांसह संपूर्ण हरणगाव परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र बिबट्याच्या थेट घरातील शिरकावाने भीतीचे वातावरण निर्माण झाले.






