बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका ठामपणे मांडली. मंगळवारी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या परिषदेत बोलताना मोदी यांनी दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजुटीने आणि एकाच आवाजात भूमिका घेण्याचे आवाहन केले. (PM Modi SCO Summit 2026)
‘दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करा’ :
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाला केवळ हिंसक कारवायांपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची गरज व्यक्त केली. दहशतवादाला मिळणारा आर्थिक पुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने यांच्याविरोधात एकत्रितपणे कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतेही दुहेरी निकष न ठेवता सर्व देशांनी एकाच आवाजात भूमिका मांडली पाहिजे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. (PM Modi SCO Summit 2026)
मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना एक ...
‘युद्धाच्या मैदानावर कोणताही तोडगा नाही’ :
जागतिक संघर्षांबाबतही पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचे भाष्य केले. युद्ध किंवा संघर्षातून प्रश्न सुटत नाहीत, तर संवाद आणि राजनयाच्या माध्यमातूनच त्यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जगभरातील युद्धे आणि संघर्ष संवाद व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्याची गरज असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. (PM Modi SCO Summit 2026)
कनेक्टिव्हिटी प्रकल्पांवरही महत्त्वाचे भाष्य :
SCO देशांमधील कनेक्टिव्हिटी प्रकल्पांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हे प्रकल्प सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारे असावेत, असे स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेकडे चीनच्या Belt and Road Initiativeच्या संदर्भातील अप्रत्यक्ष संदेश म्हणून पाहिले जात आहे. (PM Modi SCO Summit 2026)
नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय नागरिकांसाठी ३० दिवसांच्या व्हिसामुक्त ...
SCO ला २५ वर्षे पूर्ण :
यंदाची SCO शिखर परिषद विशेष महत्त्वाची आहे. या संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००१ मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी मिळून SCOची स्थापना केली होती. भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये पूर्ण सदस्य झाले. त्यानंतर २०२३ मध्ये इराण आणि २०२४ मध्ये बेलारूस या संघटनेचे पूर्ण सदस्य झाले. सध्या SCOमध्ये १० सदस्य देश आहेत. पंतप्रधान मोदींच्या दहशतवादावरील स्पष्ट भूमिकेमुळे बिश्केकमधील SCO परिषदेत भारताचा संदेश ठळकपणे समोर आला आहे. (PM Modi SCO Summit 2026)






