नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे (8th Pay Commission) लागले आहे. वेतन, पेन्शन, भत्ते, फिटमेंट फॅक्टर आणि इतर सेवा-सुविधांबाबत आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना, पेन्शनर्स संघटना आणि संबंधित घटकांशी चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात आयोगाच्या बैठका विविध शहरांमध्ये होणार असून, काही महत्त्वाच्या तारखा कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. (8th Pay Commission)
सप्टेंबरमधील महत्त्वाच्या तारखा -
७ आणि ८ सप्टेंबर : चेन्नई बैठक
आठव्या वेतन आयोगाचे पथक ७ आणि ८ सप्टेंबर रोजी चेन्नईला जाणार आहे. १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विनंती आणि आपल्या संघटनेचे मेमोरँडम सादर केलेल्या कर्मचारी-पेन्शनर्स संघटना आणि स्टेकहोल्डर्सना या बैठकीत आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. (8th Pay Commission)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर डीलर्ससाठी स्टॉक लिमिट कमी करण्याची ...
९ सप्टेंबर : पुडुचेरी बैठक :
चेन्नईनंतर आयोगाचे पथक ९ सप्टेंबर २०२६ रोजी पुडुचेरीला पोहोचणार आहे. येथेही १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अपॉइंटमेंटसाठी अर्ज केलेल्या संघटना आणि स्टेकहोल्डर्सना सहभागी होता येणार आहे.
१६, १७ आणि १८ सप्टेंबर : चंदीगड बैठक :
यानंतर आयोगाचे पथक चंदीगडचा दौरा करणार आहे. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील कर्मचारी-पेन्शनर्स संघटना तसेच इतर स्टेकहोल्डर्सशी चर्चा होणार आहे. यासाठी २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विनंती सादर करणे आवश्यक होते. (8th Pay Commission)
१८ सप्टेंबर : पुढील बैठकीसाठी अंतिम मुदत :
ऑक्टोबरमध्ये कर्नाटकातील बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्मचारी-पेन्शनर्स संघटना आणि स्टेकहोल्डर्ससाठी १८ सप्टेंबर ही महत्त्वाची अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन विनंती करणे आवश्यक आहे.
ऑक्टोबरमध्ये बंगळुरूमध्ये बैठका :
आठव्या वेतन आयोगाच्या बैठका ऑक्टोबरमध्ये बंगळुरूमध्ये होणार आहेत. ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बैठका प्रस्तावित आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन विनंती सादर करावी लागणार आहे. याशिवाय मुंबईमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांशी आयोगाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईतील बैठकीबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. (8th Pay Commission)
नवी दिल्ली : देशाचे जीएसटी महसूल संकलन ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 14.8 टक्क्यांनी वाढून सुमारे 2 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण ...
पगार आणि पेन्शनमध्ये काय बदल होऊ शकतात?
या बैठकांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन रचना, नवीन पे मॅट्रिक्स, महागाई भत्ता (DA), महागाई राहत (DR), घरभाडे भत्ता (HRA), प्रमोशन आणि इन्क्रिमेंट यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांकडून मिळणाऱ्या सूचना आयोगाच्या अंतिम शिफारसी तयार करताना महत्त्वाच्या ठरणार आहेत. मात्र, सध्या पगार किंवा पेन्शनमध्ये किती वाढ होईल, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. (8th Pay Commission)
मे २०२७ पर्यंत आयोगाला अहवाल सादर करण्याची मुदत :
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार मे २०२७ पर्यंत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत आहे. आयोगाच्या शिफारसी त्यापूर्वी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सरकारचा अंतिम निर्णय महत्त्वाचा असेल. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्समध्ये आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींबाबत उत्सुकता वाढली आहे. (8th Pay Commission)






