Nashik : नेपाळमधील महाप्रलयातून २०० नाशिककर भाविक सुखरूप परतले, मुंबई नाक्यावर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Nashik : नेपाळमधील महाप्रलयाची दृश्ये पाहून अंगावर अक्षरशः शहारे येत होते. अशा भीषण परिस्थितीत नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नाशिकमधील २०० भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. आपल्या आप्तेष्टांच्या परतीची कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत होते. अखेर भाविक सुखरूप नाशिकमध्ये दाखल होताच नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.



महाप्रलयातून २०० नाशिककर सुखरूप परतले


नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरासह विविध तीर्थक्षेत्रांच्या यात्रेसाठी गेलेले तब्बल २०० यात्रेकरू मंगळवारी सकाळी सुखरूप नाशिकमध्ये परतले. मुंबई नाका येथे श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात या भाविकांचे जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या आप्तेष्टांना सुखरूप पाहून भाविकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. भरपावसातही अनेकांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.


श्री औदुंबर भक्त मंडळाच्या वतीने दरवर्षी दत्त महाराजांच्या पादुकांसह भाविकांसाठी अल्प दरात तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक नेपाळ यात्रेसाठी गेले होते. मात्र, नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि यात्रेकरू तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंडळाच्या सेवेकऱ्यांनी तत्काळ सतर्कता बाळगत यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भाविकांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले. अखेर सर्व यात्रेकरू सुरक्षितपणे भारतात परतण्यास यशस्वी झाले.



अन् नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले


यात्रेकरूंच्या बस नाशिकमधील मुंबई नाका परिसरात दाखल होताच मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, भाविक आणि मोठ्या संख्येने नातेवाईकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर करत अनेकांनी भाविकांचे औक्षण करून स्वागत केले. काही दिवसांपासून मनात असलेली चिंता दूर झाली आणि आपल्या आप्तेष्टांना सुखरूप डोळ्यांसमोर पाहताच अनेक नातेवाइकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. भाविकांच्या सुखरूप परतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Comments
Add Comment

Sindhudurg Crime: शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी मुंबईला जाण्याचं स्वप्न अधुरं; कुडाळमध्ये एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या

कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या

Hiware Bazar: पाण्याचा ताळेबंद मांडणारे हिवरे बाजार देशात पहिले

नगर (प्रतिनिधी) : आदर्श गाव हिवरे बाजार येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या

Raj Babbar: ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दिवंगत पत्नीच्या आठवणीत भावूक; म्हणाले, "...तिची प्रचंड आठवण येतेय"

मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,