Nashik Crime News : बनावट सही, शिक्का अन् लेटरहेड, मविप्रच्या नावाने २१ लाखांची फसवणूक

Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गंगापूर रोडवरील कोट्यवधी रुपये किमतीच्या तब्बल १४ हजार ४८६ चौरस मीटर जमिनीचा बनावट व्यवहार दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात मविप्र संस्थेचे बनावट लेटरहेड, शिक्का आणि सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची बनावट सही आणि फोटो वापरण्यात आला. या प्रकरणी ॲड. नितीन ठाकरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी मुख्य संशयित आणि कायदेशीर सल्लागार भूषण शेवाळेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


फिर्यादीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित भूषण शेवाळे आणि त्याच्या साथीदारांनी मविप्र संस्थेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. संस्थेने गंगापूर रोडवरील जमीन बँकेत तारण ठेवून कर्ज घेतले होते आणि कर्जाची परतफेड न केल्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेविरोधात निकाल दिला असल्याचा खोटा दावा या कागदपत्रांमध्ये करण्यात आला. यानंतर हा कथित वाद न्यायाधिकरणात म्हणजेच डीआरटीमध्ये लढण्यासाठी भूषण शेवाळे याची मविप्र संस्थेने लिगल असिस्टंट म्हणून नियुक्ती केली असून, त्याला तब्बल सात कोटी रुपये फी देण्याचे ठरले आहे, असा बनावट एमओयू आणि नोटरी दस्तऐवज तयार करण्यात आला.


फसवणुकीला विश्वासार्हता मिळावी यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही बनावट तयार करण्यात आला. मात्र, तपासादरम्यान हा आदेश मविप्र संस्थेशी संबंधित नसून एका बँकेच्या वेगळ्याच प्रकरणातील असल्याचे समोर आले.या बनावट कागदपत्रांच्या आधारे जाधव पिता-पुत्रांना स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल २१ लाख रुपये उकळण्यात आले.



असा उघड झाला फसवणुकीचा प्रकार


फसवणुकीचा हा प्रकार त्यावेळी उघडकीस आला, जेव्हा जाधव पिता-पुत्र थेट मविप्रच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची भेट घेऊन संशयितांनी दिलेला नोटरी केलेला कागद त्यांना दाखवला. या कागदावर स्वतःची बनावट सही आणि सात कोटी रुपयांच्या व्यवहाराचा मजकूर पाहून ॲड. नितीन ठाकरे यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी मविप्र संस्थेविरोधात असा कोणताही आदेश झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संस्थेच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच ॲड. नितीन ठाकरे यांनी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.



वकील आणि नोटरी करणारेही पोलिसांच्या रडारवर


या प्रकरणी भूषण गमनराव शेवाळे, अमोल एन. बिडवे, ॲड. अश्विनी एस. गायकवाड आणि बनावट एमओयू व नोटरी करणारे ॲड. नोटरी ए. आय. शेख यांच्यासह पाच जणांविरोधात सोमवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत. संशयितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Comments
Add Comment

Rakhi Sawant : आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; न्यायालयात गैरहजर राहिल्याने कारवाई

Entertainment News: अभिनेत्री राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील न्यायालयाने 2010 मधील

INDW vs ZIMW: स्मृती मंधाना आणि शफाली वर्माकडे टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1067409" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला संघातील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टी20

हॉर्लिक्स अन् नेस्कॅफे अडचणीत! पॅकेजिंगवरील दाव्यांबाबत FSSAIची नोटीस

हॉर्लिक्स, नेस्कॅफे यांसारखे पदार्थ आपण हाडं मजबूत करण्यासाठी किंवा शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून वापरतो. या

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री