Prakash Abitkar : सरकारी रुग्णालयांच्या सेवांना आता स्टार रेटिंग; गैरप्रकार आणि गुणवत्तेच्या कमतरतेवर आरोग्य विभागाची नजर - प्रकाश आबिटकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत व बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंग प्रणालीची नजर राहणार असुन, सेवांमध्ये कोणताही गैरप्रकार,अनियमितता, गुणवत्तेची कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. (Prakash Abitkar)


मुंबईत आरोग्यसेवा आयुक्तालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बाह्यस्रोतांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत, यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा (HLL) सेवा,रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सिटी स्कॅन, एमआरआय, उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार पुरवठा, स्वच्छता तांत्रिक सहाय्य, आदी सेवांचा आढावा घेण्यात आला. (Prakash Abitkar)



नागरिकांना दर्जेदार सेवा मिळणे ही विभागाची प्राथमिकता आहे. त्यामुळे बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण आणि मूल्यांकन करावे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेवांची नियमित तपासणी करून गुणवत्तेचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. (Prakash Abitkar)


राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत विशेष वैद्यकीय सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर आणि रुग्णांचे अभिप्राय आदी निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे. (Prakash Abitkar)



राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून सकस व आरोग्यदायी आहार पुरवठा करण्याच्या स्थानिक आमदारांच्या सहभागाने आरोग्य समितीच्या बैठका घेऊन त्यातील कार्यवाहीची अंमलबजावणी आणि त्याबाबतचा अहवाल तयार करावा, नोव्हेंबर महिन्यात जनआरोग्य समितीची राज्यस्तरीय बैठक होणार असून, त्यापूर्वी राज्यातील सर्व जन आरोग्य समित्या प्रभावी पने कार्यान्वित असाव्यात, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Prakash Abitkar)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी प्रभावी वापर करावा आणि नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे शासनाचे धोरण असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. (Prakash Abitkar)


बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव इ. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, रुग्णालय-आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षक सहभागी झाले होते. (Prakash Abitkar)


Comments
Add Comment

INDW vs ZIMW: वैष्णवी शर्माने झिम्बाब्वेचा निम्मा संघ केला गारद, क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

[caption id="attachment_1070127" align="aligncenter" width="800"] झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत वैष्णवी शर्माने प्रभावी कामगिरी केली. वडोदरा येथे

Cyclone Arnab Update: सावधान! भारतासह नेपाळवर 'अर्णब' चक्रीवादळाचे भीषण संकट, 5 जणांचा मृत्यू तर 57 ट्रेन रद्द!

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, 20 ची कचोरी पडली 20 लाखांना; कसं काय CCTV व्हिडिओमधून प्रकार उघड

जयपूर : अवघ्या 20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबलेल्या एका कलेक्शन एजंटला तब्बल 20 लाख रुपयांचा फटका बसल्याची

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

WPL 2027 Auction Live: सोफी मोलिन्यूसाठी युपी वॉरियर्सने मोजले 1.10 कोटी

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी

INDW Vs ZIMW: टी20 नंतर झिम्बाब्वेला वनडे मालिकेत क्लिन स्विप, स्मृती मंधानाच्या नेतृत्वात विजयी घोडदौड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी येथे पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल