नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर आता राजकीय आणि हवामान न्यायाच्या (Climate Justice) संघर्षाला तोंड फुटले आहे. या दुर्घटनेनंतर नेपाळने जगातील विकसित आणि सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांविरोधात स्पष्ट भूमिका घेतली असून, "पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या देशांनीच या नुकसानीची भरपाई दिली पाहिजे," अशी मागणी लावून धरली आहे.
उपग्रहाच्या चित्रांमधून भीषण अपघाताचे गूढ उकलले
नेपाळच्या जलशास्त्र आणि हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ बिनोद पराजुली यांनी या दुर्घटनेच्या कारणांवरून पडदा उचलला आहे. चीनकडून मिळालेल्या उपग्रहाच्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर ही आपत्ती बर्फाची कडा कोसळणे (Ice Avalanche), परमाफ्रॉस्टची (कायम गोठलेली जमीन) हालचाल आणि डोंगराची कडा ढासळणे (Rockslide) या तिन्ही घटना एकाच वेळी घडल्यामुळे आल्याचे समोर आले आहे.
नेपाळमधून सुरू झालेला प्रलय चीनमध्ये आणि पुन्हा नेपाळमध्ये
ही दुर्घटना नेपाळच्या हद्दीत हिमकडा कोसळल्याने सुरू झाली. त्यानंतर हे बर्फ आणि खडकाचे मोठे अवशेष सीमा ओलांडून चीनच्या हद्दीत गेले. तिथे प्रचंड पाण्याचा साठा निर्माण होऊन ल्हेंदे खोला, भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांमध्ये अचानक महापूर आला. या पुरामुळे नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे.
हजारो लोकांचा मृत्यू आणि नागरिक लापता : भीषण जीवितहानी
या महापुरात नेपाळमध्ये मोठे मानवी नुकसान झाले आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, या आपत्तीत १,०६६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ४,६०६ नागरिक अजूनही लापता आहेत. चीनच्या हद्दीतील जीवितहानीची आकडेवारी वेगळी नोंदवली जात आहे. सध्या त्रिशूली आणि आसपासच्या भागात लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सुरक्षेच्या चिंतेत भर घालणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वॉकरच्या साहाय्याने थेट ...
"मदत नको, हक्क आणि भरपाई द्या!" - नेपाळ आक्रमक
या घटनेनंतर नेपाळने जागतिक स्तरावर आपल्या राजनैतिक धोरणात मोठा बदल केला आहे. परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी 'कांतीपूर टीव्ही'शी बोलताना सांगितले की, चीन, अमेरिका आणि भारत यांसारख्या मोठ्या देशांमुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषण आणि हवामान बदल होत आहेत; पण याची मोठी किंमत नेपाळसारख्या लहान देशांना मोजावी लागत आहे. "आम्ही आता इतरांकडे भीक किंवा मदत मागत नसून, आमचा कायदेशीर आणि नैतिक हक्क मागत आहोत," असे सांगत त्यांनी या अपघाताची भरपाई मोठ्या देशांनी देण्याची मागणी केली.
पंतप्रधान बालेन्द्र शाह यांचे जागतिक समुदायाला आवाहन
दुसरीकडे, नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी अत्यंत मुत्सद्दी आणि संयमित भाषेत आपली बाजू मांडली. बचावकार्यासाठी पहिल्या दिवसापासून तातडीने मदत, तंत्रज्ञ आणि हवाई पाहणीसाठी विमाने पाठवल्याबद्दल त्यांनी भारत आणि चीनचे आभार मानले. मात्र, सोबतच त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, "हवामान बदलामागे जागतिक स्तरावरील घटकांचा हात आहे, त्यामुळे या बदलांचे परिणाम टाळणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे ही संपूर्ण जागतिक समुदायाची सामूहिक जबाबदारी आहे."