मुंबई : आजच्या डिजिटल युगात UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून काही सेकंदांत पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य झाले आहे. मात्र, देशातील अनेक नागरिक अजूनही फीचर फोनचा वापर करतात. अशा वापरकर्त्यांसाठी आता PhonePe ने UPI 123Pay सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे इंटरनेटशिवाय फीचर फोनवरूनही UPI व्यवहार करता येणार आहेत. (PhonePe UPI 123Pay)
UPI 123Pay म्हणजे काय?
UPI 123Pay ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सुविधा आहे. फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या सेवेच्या माध्यमातून पैसे पाठवता आणि स्वीकारता येतात. मोबाईल नंबर किंवा UPI IDच्या माध्यमातून व्यवहार करता येतो. याशिवाय वापरकर्त्यांना बँक खात्यातील शिल्लक तपासणे आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहणे यांसारख्या सुविधाही मिळतात. भविष्यात बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि आधार आधारित UPI नोंदणी यांसारख्या सुविधा जोडण्याची योजनाही असल्याचे सांगण्यात आले आहे. (PhonePe UPI 123Pay)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचे (Strait of Hormuz) नाव बदलून ‘ट्रम्प ...
कोणत्या फीचर फोनवर वापरता येणार?
ही सेवा अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी Nokia, HMD, Lava आणि itel यांसारख्या फीचर फोन ब्रँड्ससोबत उपलब्ध करण्यात आली आहे. HMD Globalच्या माहितीनुसार, सध्या HMD 105 2G, HMD 110 2G, Nokia 105 Classic, Nokia 105 Single SIM, Nokia 105 Dual SIM, Nokia 106 आणि Nokia 123 Shield या फीचर फोनवर ही सुविधा उपलब्ध आहे. भविष्यात इतर फीचर फोनवरही ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (PhonePe UPI 123Pay)
१२ भारतीय भाषांमध्ये AI Voice Helpline :
UPI सेवा सक्रिय करण्यासाठी PhonePe कडून इंग्रजीसह १२ भारतीय भाषांमध्ये AI आधारित व्हॉइस हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे फीचर फोन वापरकर्त्यांना UPI 123Pay सेवा सेटअप करणे अधिक सोपे होणार आहे. (PhonePe UPI 123Pay)
मुंबई : नालासोपाराचे प्राचीन नाव ‘शूरपरक’ पुन्हा बहाल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) यासंदर्भातील प्रस्ताव ...
UPI 123Payची नोंदणी कशी कराल?
फीचर फोनवर UPI 123Pay सेवा सक्रिय करण्यासाठी पुढील प्रक्रिया करता येईल:
- PhonePeची 123UPI सेवा उघडा. - त्यानंतर तुमची बँक निवडा. - डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि कार्डची समाप्ती तारीख यासारखी आवश्यक माहिती द्या. - त्यानंतर UPI PIN सेट करा. - नोंदणी पूर्ण झाल्यानंतर इंटरनेटशिवाय फीचर फोनवरून UPI व्यवहार करता येतील.
यामुळे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नसलेल्या नागरिकांनाही डिजिटल पेमेंटच्या सुविधेचा लाभ घेणे सोपे होणार आहे.




