Ahilyanagar Crime : नशेसाठी वापरले जाणारे ४० इंजेक्शन जप्त, तीन जण ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातून अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून खरेदी करून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मेफेनटर्माईन सल्फेट’ (Mephentermine Sulphate) इंजेक्शनच्या तब्बल ४० बाटल्या कोतवाली पोलिसांनी गांधी मैदान परिसरातून जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रताप अशोक अकोलकर, तेजस गंगाधर वारुळे, आणि तेजस अमित उळागड्डे यांचा समावेश आहे.(Ahilyanagar Crime News)



व्यायामपटूंकडून इंजेक्शनचा वापर ?


विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले हे तिन्ही आरोपी व्यायामशाळेत म्हणजेच जिममध्ये जाणारे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यायामपटूंकडून या नशेच्या इंजेक्शनचा वापर केला जात असावा, असा प्राथमिक संशय कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी अशाच प्रकारच्या नशेच्या इंजेक्शनचा वापर उघडकीस आणत तब्बल सहा गुन्हे दाखल केले होते. मात्र श्रीरामपूरमध्ये या इंजेक्शनचा वापर थेट नशेसाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले होते. तर अहिल्यानगर शहरात प्राथमिक तपासादरम्यान या इंजेक्शनचा वापर व्यायामपटूंकडून केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)



शाळा परिसरात नशेच्या पदार्थांची देवाणघेवाण


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अटक केलेल्या तिघांनी समाज माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे या इंजेक्शनची खरेदी केली होती. ‘मेफेनटर्माईन सल्फेट’ हे इंजेक्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास मनाई आहे. असे असतानाही या तिघांनी ऑनलाइन माध्यमातून इंजेक्शनची खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.धक्कादायक बाब म्हणजे, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधी मैदान परिसरातच या इंजेक्शनची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात होता. या परिसरात जवळपास चार शाळा आहेत. त्यामुळे शाळांच्या परिसरात अशा प्रकारच्या नशेच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांनी ऑनलाइन माध्यमातून एक इंजेक्शन सुमारे ३०० रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर तेच इंजेक्शन तब्बल ६०० रुपयांना विकण्याची तयारी होती. म्हणजेच प्रत्येक इंजेक्शनच्या विक्रीतून दुप्पट रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक मोटरसायकलही हस्तगत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ‘मेफेनटर्माईन सल्फेट’च्या ४० बाटल्यांची एकूण किंमत सुमारे १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने या इंजेक्शनचा पुरवठा नेमका कुठून होत होता, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि शहरात या इंजेक्शनचा वापर किती प्रमाणात केला जात आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे. (Ahilyanagar Crime News)



गांजाप्रकरणीही एकाला बेड्या


दरम्यान, कोतवाली पोलिसांनी याच कारवाईदरम्यान अमली पदार्थांविरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. केडगाव उपनगरातील वैष्णवनगर परिसरातील तिरंगा चौकात एका घराच्या आवारात गांजाची झाडे लावून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून विकास बाळू उमाप याला अटक करण्यात आली आहे. विकास उमाप याच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ किलो २५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे १ लाख ८२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घराच्या आवारात गांजाची झाडे लावून त्याची विक्री केली जात असल्याचा आरोप असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.

Comments
Add Comment

Anna Bansode : दादर चैत्यभूमी - इंदूमिल रस्ता रुंदीकरणासाठी अंदाजपत्रक तातडीने तयार करा - अण्णा बनसोडे

मुंबई : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक

Mumbai Valsad passenger gambling video : मुंबई-वलसाड पॅसेंजर ट्रेनमध्ये जुगाराचा खेळ अन् सीटवर चक्क... व्हायरल व्हिडिओने खळबळ!

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते वलसाड (Walsad) दरम्यान जाणाऱ्या ५९०२३ जलद पॅसेंजर ट्रेनमध्ये काही प्रवाशांकडून चक्क

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर

Indian Army : भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद, नदीत वाहून गेले

नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे

Bharat Gogawale : सप्टेंबर संपण्याआधी महामंडळांचे वाटप होईल!

- मंत्री भरत गोगावले; रोजगार हमी योजनेचे केंद्राकडे ३ हजार कोटी रुपये रखडल्याची माहिती मुंबई : सप्टेंबर महिना

Ahilyanagar Crime : घरातच सुरू होता कुंटणखाना, तीन महिलांची सुटका तर ५६ वर्षीय महिला ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातून अनैतिक व्यवसायाविरोधातील मोठी कारवाई समोर आली आहे. एमआयडीसी