Friday, September 4, 2026

Mumbai Plastic Ban : मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर पुन्हा कारवाई जोरात; फेरीवाले आणि मोठ्या गोदामांवर धडक कारवाई करण्याचे विधी समिती अध्यक्षांचे निर्देश

Mumbai Plastic Ban : मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर पुन्हा कारवाई जोरात; फेरीवाले आणि मोठ्या गोदामांवर धडक कारवाई करण्याचे विधी समिती अध्यक्षांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून, त्यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक आहे. या पिशव्यांमुळे पावसाळ्यात नाले व गटारे तुंबण्याबरोबरच पर्यावरण आणि मुंबईकरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांवर आणि मोठ्या गोदामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधी व महसूल समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी परवाना विभाग तसेच दुकाने व आस्थापना विभागाला पत्र लिहून केले आहे.

विधी व महसूल समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी संबंधित विभागांना पाठवलेल्या या पत्रात मुंबई शहरात दररोज सरासरी ६३०० हून अधिक मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पिशव्या सहजपणे विघटन होत नाही. पावसाळ्यात या पिशव्या नाले-गटारांमध्ये अडकून पाण्याचा निचरा रोखतात. परिणामी मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात.

यासाठी मुंबईतील २६ विभागांमधील फेरीवाले आणि मोठे गोदामधारक यांची पाहणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. पाहणीदरम्यान ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या अथवा एकदा वापरलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा किंवा वापर आढळल्यास संबंधितांवर तात्काळ ठोस कारवाई करावी, तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे नाले तुंबण्याची समस्या गंभीर होत असून, मुंबईतील पावसाळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने केवळ कारवाईचे आदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष विभागीय पातळीवर नियमित तपासणी करून प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी भूमिका पत्रातून मांडण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >