Kalki 2898 AD Fake Casting : ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या नावाने फेक कास्टिंग कॉल्स; निर्मात्यांचा इशारा!

मुंबई : ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाच्या नावाने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या नावाचा गैरवापर करून बनावट कास्टिंग कॉल्स आणि ऑडिशनच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वैजयंती मूव्हीजने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसह कलाकार आणि ऑडिशन देऊ इच्छिणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Kalki 2898 AD Fake Casting)



‘कल्की २८९८ एडी’च्या नावाने जाहीर फसवणूक


वैजयंती मूव्हीजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर महत्त्वाची सूचना जारी केली आहे. काही व्यक्ती किंवा एजन्सी चित्रपटाच्या नावाने बनावट कास्टिंग कॉल्स करत असून, आम्ही वैजयंती मूव्हीजचे प्रतिनिधि आहोत असा दावा करत आहेत असे निर्मात्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशा कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रोडक्शन हाऊसने स्पष्ट केले आहे की, आमचा कोणत्याही थर्ड-पार्टी एजन्सी, कंपनी, व्यक्ती किंवा कास्टिंग प्रतिनिधीशी संबंध नाही. तसेच आमच्या वतीने ऑडिशन किंवा कलाकारांची निवड करण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आलेले नाही. त्यामुळे कास्टिंगच्या नावाखाली संपर्क साधणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. (Kalki 2898 AD Fake Casting)



वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ उकळण्याची शक्यता


बनावट कास्टिंगच्या माध्यमातून लोकांकडून वैयक्तिक माहिती किंवा पैसे उकळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑडिशनच्या नावाखाली कोणालाही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे किंवा इतर तपशील शेअर करू नका, तसेच कोणतेही पैसे देऊ नका, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. (Kalki 2898 AD Fake Casting)



‘कल्की’ चित्रपटाबाबत...


दरम्यान, ‘कल्की २८९८ एडी’ने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार पटकावले आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट (संपूर्ण मनोरंजनासाठी)’ आणि ‘सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर’ या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाला. ‘कल्की २८९८ एडी’च्या सिक्वेलचीही चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत साधारण दहा दिवसांचे चित्रीकरण केले आहे. तर, लवकरच चित्रपटाचा अन्य भाग शूट करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटात दीपिका पदुकोण दिसणार नाही. (Kalki 2898 AD Fake Casting)

Comments
Add Comment

Irina Rudakova : 'मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे'; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  

Mumbai : 'बिग बॉस मराठी ५' फेम आणि रशियन मॉडेल-अभिनेत्री इरिना रुडाको

Radhika Bhide : राधिका भिडेच्या आवाजाची पुन्हा जादू; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवं गाणं रिलीज

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) रंगात

Mithun Chakraborty : वयाच्या ७२व्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मिथुन चक्रवर्तींचा मोठा कमबॅक

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही असे तारे आहेत, ज्यांची ओळख फक्त त्यांच्या हिट चित्रपटांमुळे नाही, तर त्यांच्या दीर्घ

The Traitors Season 2 : 'द ट्रेटर्स सीझन २' चा महाअंतिम सामना : करण जोहरच्या शोचा फायनल एपिसोड आज रात्री; विजेता कोण ठरणार ?

विश्वास, रणनीती आणि विश्वासाघाताने भरलेला 'द ट्रेटर्स' (The Traitors) या लोकप्रिय रिएलिटी शोचा दुसरा सीझन आता अंतिम

Hanuman Ansh Global Release : भारतात धुमाकूळ घातल्यानंतर ‘हनुमान अंश’ आता जगभरात पोहोचणार; 11 सप्टेंबरला ग्लोबल रिलीज

भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ हा हिंदी भक्तिपर चित्रपट आता जगभरातील

Charu Asopa : 'मला त्याच्या बॅगेत कंडोम सापडले'; टीव्ही अभिनेत्रीचा नवऱ्यावर गंभीर आरोप

Charu Asopa : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्या वैवाहिक नात्याची पुन्हा एकदा चर्चा