मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याविरुद्ध मनसेचे गजानन काळे यांनी मोठा गाजावाजा करत केलेले सर्व आरोप हे धादांत खोटे, हास्यास्पद आणि खोडसाळ स्वरूपाचे आहेत. केवळ राजकीय सूडबुध्दीने त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे खोटे-नाटे आरोप करणारे गजानन काळे यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल.
- मंत्री मंगल प्रभात लोढा; पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’साठी राज्यव्यापी तयारी मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी ...
विधानसभा निवडणूक लढविताना निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व वस्तुस्थिती नमूद करण्यात आली होती. या प्रतिज्ञापत्रामधील सर्व गुन्हे सार्वजनिक जीवनात जनतेच्या न्याय्यहक्कांसाठी करण्यात आलेल्या राजकीय आंदोलनाच्या निमित्ताने दाखल करण्यात आले होते, ते सर्व गुन्हे त्याही वेळेला न्यायप्रविष्ठ होते. यातील सर्व प्रकरणांमध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार न्यायालयातील खटले निकाली निघाले आहेत व खटल्यातून त्यांची दोषमुक्तता करण्यात आलेली आहे. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्या संदर्भात अधिक स्पष्टतेने नमूद केले आहे. तसेच या सर्व गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या (Goregoan Metro Station) अगदी खाली उभ्या ...
गजानन काळे यांचे सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. निव्वळ राजकीय सूडबुध्दीतून प्रतिमा मलीन करण्यासाठी, चारित्र्यहनन तसेच बदनामी करण्याच्या हेतूने व प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. या खोट्या व चुकीच्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल होऊ नये यासाठी हा खुलासा करण्यात येत आहे.




