Friday, September 4, 2026

Nashik Grapes : नाशिकच्या द्राक्षांची सातासमुद्रापार झेप ! शेतमालाची निर्यात २७ हजार कोटींवर

Nashik Grapes : नाशिकच्या द्राक्षांची सातासमुद्रापार झेप ! शेतमालाची निर्यात २७ हजार कोटींवर

Nashik Grapes : नाशिकच्या शेतमालाला आता जगभरातील बाजारपेठांची दारे अधिक खुली होत आहेत. जिल्ह्याची २०२५-२६ मधील निर्यात २७हजार ३२५ कोटी रुपयांवर पोहोचली असून, वर्षभरात १२.४६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हजारो द्राक्ष उत्पादक निर्यातसाखळीत सहभागी झाल्याने नाशिकच्या शेतीला जागतिक बाजारपेठेची जोड मिळत आहे.मात्र, वाढत्या निर्यातीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांच्या खिशात किती पाहोचतो, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे.

द्राक्ष बाजारात नाशिकचे वर्चस्व कायम

नाशिक विभागाची निर्यात ३१ हजार ६४१ कोटींवरून ३५ हजार ३२१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा तब्बल ७७.४ टक्के वाटा आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या निर्यात नकाशावर नाशिकचे वर्चस्व कायम आहे. २०२३-२४च्या हंगामात नाशिक जिल्ह्यात २८ हजारांहून अधिक द्राक्ष उत्पादकांनी सुमारे १८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राची निर्यात नोंदणी केली होती. याच हंगामात जिल्ह्यातून १.५७ लाख टन द्राक्षांची निर्यात झाली. यापैकी १.१८ लाख टन द्राक्षे युरोपीय देशांत, तर सुमारे ३९ हजार टन द्राक्षे अन्य देशांत गेली. त्यामुळे निर्यातसाखळी मोठ्या संख्येने द्राक्ष उत्पादकांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होते. निर्यात वाढल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपलीकडे मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षांना मागणी असताना उत्पादकांना तुलनेने चांगला भाव मिळू शकतो. २०२५ मधील वृत्तानुसार, निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ७५ ते ११० रुपयांपर्यंत दर मिळाल्याची नोंद आहे.

कांदा-द्राक्षांपलीकडे निर्यातीचा विस्तार

नाशिकची निर्यात आता कांदा-द्राक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अभियांत्रिकी वस्तू, वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, प्रक्रिया अन्न, वस्त्रोद्योग आणि औषधनिर्मिती क्षेत्रांचा ही वाटा वाढत आहे. परिणामी पॅकहाऊस (Packhouse) कोल्डचेन (cold chain) , वाहतूक (Transportation), प्रक्रिया उद्योग (Processing Industry)आणि निर्यात सेवांमध्ये रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >