Nashik News : जिल्हा आरोग्य विभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे (District Health Officer Dr. Sudhakar More) यांना शासनाने निलंबित केले आहे. डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत गेल्या तीन वर्षांपासून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. कामे वेळेत न करणे, कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे, कर्मचाऱ्यांचा छळ करणे, नियमितपणे कामावर हजर न राहणे आणि आरोग्य केंद्रांना भेटी न देणे, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. याशिवाय बदल्यांच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीही त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. (Nashik News)
Nashik Mhada Scam : नाशिकमधील बहुचर्चित सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. या प्रकरणाच्या तपासात एकापाठोपाठ एक धक्कादायक ...
नेमकं प्रकरण काय ?
गेल्या महिन्यात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर (Health Minister Prakash Ambitkar) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील मंत्री आणि विविध लोकप्रतिनिधींनी डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत आरोग्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या. डॉ. मोरे कामे ऐकत नाहीत, जबाबदारी झटकतात आणि कर्मचाऱ्यांना त्रास देतात, असा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. तसेच त्यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही चौकशी झाली होती. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडेही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणातही त्यांच्या कामकाजावर ठपका ठेवण्यात आला होता. (Nashik News)
Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध आश्रमशाळांमधील तब्येत ...
१५ दिवसांपूर्वी बजावली होती कारणे दाखवा नोटीस
वाढत्या तक्रारींची दखल घेत आरोग्य विभागाने सुमारे १५ दिवसांपूर्वी डॉ. मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी त्यावर खुलासा सादर केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील पांगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेंद्र थविल (Dr. Jayendra Thavil) यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. थविल यांच्या कामकाजाबाबतही यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मुख्यालयी न थांबणे, रुग्णांची तपासणी न करणे, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चौकशी सुरू असतानाच डॉ. जयेंद्र थविल यांच्यावरही शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.