Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ही नवीन नियमित दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे मुंबई ते कोकण थेट रेल्वे प्रवासाचा पर्याय अधिक बळकट होणार आहे.
मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. टॅक्सीतून उतरत असतानाच BESTच्या वेट-लीज ...
गाडीचे वेळापत्रक आणि फेऱ्या
गाडी क्रमांक 15087 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड एक्सप्रेस): दिनांक ०८.०९.२०२६ पासून दररोज चालवण्यात येईल. ही गाडी CSMT येथून दररोज रात्री २३:५५ वाजता सुटेल. दिनांक २०.१०.२०२६ पर्यंतच्या पावसाळी वेळापत्रकानुसार ती सावंतवाडी रोड येथे दुपारी १३:५० वाजता पोहोचेल; तसेच दिनांक २१.१०.२०२६ पासून (पावसाळ्यानंतरच्या वेळापत्रकानुसार) ती सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १४:१५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 15088 (सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस): दिनांक ०९.०९.२०२६ पासून दररोज चालवण्यात येईल. ही गाडी सावंतवाडी रोड येथून संध्याकाळी १७:०० वाजता (दिनांक २०.१०.२०२६ पर्यंतच्या पावसाळी वेळापत्रकानुसार) आणि दिनांक २१.१०.२०२६ पासून १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
- 'एसओपी' निश्चितीसाठी आज बैठक; मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्षांचा बहिष्कार मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक ...
प्रमुख थांबे
ही एक्सप्रेस दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.
गाडीची संरचना (कोच कंपोझिशन)
या गाडीमध्ये एकूण २० डब्यांचा समावेश असेल, ज्यामध्ये:
१ वातानुकूलित प्रथम श्रेणी (1st AC)
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2nd AC)
३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (3rd AC)
४ शयनयान (Sleeper)
४ सामान्य द्वितीय श्रेणी
१ पँट्री कार
१ पार्सल व्हॅन
१ द्वितीय व गार्ड ब्रेक व्हॅन
१ जनरेटर व्हॅन
- अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सोमवारी आनंदाचे ...
तिकीट आरक्षण आणि सुविधा
गाडी क्रमांक 15087 (प्रारंभ दिनांक ०८.०९.२०२६) चे आरक्षण दिनांक ०८.०९.२०२६ रोजी सुरू होईल. तसेच, दिनांक ०९.०९.२०२६ पासून सुरू होणाऱ्या सर्व नियमित सेवांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे तिकीट युटीएस (UTS) प्रणालीद्वारे काढता येईल, तर प्रवाशांच्या सोयीसाठी 'रेलवन' ॲप देखील उपलब्ध आहे. गाड्यांच्या सविस्तर थांब्यांच्या वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा एनटीइएस (NTES) ॲप डाउनलोड करावे, असे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.