Sunday, September 6, 2026

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून ओसरला, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून ओसरला, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे ( El Nino Effect) महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी राज्यात अपेक्षित असा जोरदार पाऊस झालेला नाही. बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. सर्वदूर पाऊस नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली असून खरीप हंगामातील पिकांना पाण्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Maharashtra Monsoon)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात मोठी आणि प्रभावी हवामान यंत्रणा सक्रिय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात चढ-उतार कायम राहतील आणि उष्णता व दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याला सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

कोकण विभागात पावसाची शक्यता

कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये हलक्या सरी पडू शकतात, तर सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पाऊस पडेल, पण मैदानी भागात केवळ तुटपुंज्या सरींची शक्यता आहे. ( Weather Department Update)

मराठवाड्यात कोरडे राहिल वातावरण

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या भागात हवामान मुख्यत्वे कोरडे आणि उष्ण राहील. हिंगोली आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात गडचिरोली वगळता नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांत कोणताही अलर्ट नाही. राज्यात सर्वदूर चांगला पाऊस कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.( Maharashtra Farmers Concern)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >