Monday, September 7, 2026

Nashik : नाशिकमध्ये 5 कोटींच्या कत्तलखाना-बीफ मार्केटला ब्रेक, महापौरांचा मोठा निर्णय

Nashik : नाशिकमध्ये 5 कोटींच्या कत्तलखाना-बीफ मार्केटला ब्रेक, महापौरांचा मोठा निर्णय

Nashik : कुंभ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये कत्तलखाना आणि बीफ मार्केट उभारण्याच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भद्रकाली परिसरात कत्तलखाना आणि बीफ मार्केट उभारण्यासाठी नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची ई-निविदा काढण्यात आली होती. मात्र, या निविदेला महापौर हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांनी विरोध करत ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik News)

5 कोटींचा निधी आता नागरी सुविधांसाठी

नाशिक महापालिका प्रशासनाकडून (Nashik Municipal Corporation Administration) बीफ मार्केट आणि कत्तलखान्यासाठी परस्पर निविदा (Tender) काढण्यात आल्याचा आरोप महापौर हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांनी केला आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरात कत्तलखाना आणि बीफ मार्केट उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, महापौर हिमगौरी आडके (Himgauri Adke) यांनी या निविदेला विरोध करत ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कत्तलखाना आणि बीफ मार्केटसाठी प्रस्तावित करण्यात आलेला सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी आता नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. (Nashik News)

महापौरांचा कत्तलखान्याला विरोध

कत्तलखाना आणि बीफ मार्केटला विरोध करताना महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “नाशिकच्या पावित्र्याशी आणि नागरिकांच्या भावनांशी तडजोड केली जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भद्रकाली परिसरातील प्रस्तावित कत्तलखाना आणि बीफ मार्केट प्रकल्पाला तूर्तास ब्रेक लागला आहे. दुसरीकडे, या प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेला निधी आता रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी कामांसाठी वळवण्यात येणार असल्याने या निर्णयाची नाशिकमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >