Monday, September 7, 2026

Nashik Rain Update : नाशिककरांनो, पुढचे काही दिवस पावसाचे ! मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा

Nashik Rain Update : नाशिककरांनो, पुढचे काही दिवस पावसाचे ! मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा

Nashik Rain Update : नाशिक जिल्हा आणि परिसरात पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) म्हणजेच IMD ने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जारी केला असून, आज सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याच्या स्थितीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजामुळे पुढील काही दिवस नाशिककरांना पावसाचा सामना करावा लागू शकतो.

७ आणि ८ सप्टेंबरला पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार ८ सप्टेंबर रोजी देखील जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर ९ आणि १० सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. तर ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Nashik Rain Update)

‘Very Likely’ची शक्यता

दरम्यान, या कालावधीतील पावसासाठी हवामान विभागाने ‘Very Likely’ म्हणजेच पावसाची तीव्र शक्यता दर्शवली आहे. विशेषतः अचानक होणारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पावसादरम्यान वीजांचा कडकडाट किंवा सोसाट्याचा वारा सुरू झाल्यास नागरिकांनी मोकळ्या जागेत जाणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Rain Update)

घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ७ सप्टेंबर रोजी घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर ८ सप्टेंबर रोजी घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ९ सप्टेंबर रोजी पुन्हा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, १० सप्टेंबरला हलक्या सरी पडू शकतात. विशेष म्हणजे ११ सप्टेंबर रोजी घाट परिसरात पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह घाट परिसरातून प्रवास करणाऱ्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. पावसासोबत अचानक मेघगर्जना आणि वादळी वारे होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा