Jalgaon : जाहीर केले 51 हजार, हातात दिले फक्त 5,100 ! जळगावात दहीहंडीवरून गोविंदांचा रस्ता रोको

Jalgaon : दहीहंडी उत्सवात सात थर लावून जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांच्या हातात बक्षिसाच्या नावाखाली अवघे 5 हजार 100 रुपये दिल्याने जळगावात मोठा वाद निर्माण झाला आहे. आयोजकांनी प्रसारमाध्यमांमधून 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असा दावा गोविंदा पथकाने केला आहे. मात्र, हंडी फोडल्यानंतर आयोजकांनी पूर्ण रक्कम देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सुभाष चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात हा प्रकार घडला.



जाहीर केले 51 हजार, दिले फक्त 5,100


यंदाच्या उत्सवासाठी उच्च थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. हीच घोषणा पाहून गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी तब्बल 7 थर लावत दहीहंडीला सलामी दिली. सात थरांचा सराव करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मेहनत घेतल्याचं गोविंदांचं म्हणणं आहे. या दरम्यान अनेक गोविंदा जखमीही झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सलामीनंतर जाहीर केल्याप्रमाणे 51 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, सलामी दिल्यानंतर आयोजकांनी 51 हजार रुपये देण्यास नकार देत केवळ 5 हजार 100 रुपये देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोविंदा पथकाने केला.



गोविंदांचा दहीहंडीखालीच ठिय्या


यामुळे संतप्त झालेल्या गोविंदांनी आयोजकांविरोधात थेट नाराजी व्यक्त केली. "ही आमची उघड फसवणूक आहे. जीव धोक्यात घालून सात थर लावले, मग जाहीर केलेली रक्कम देण्यास नकार का?" असा सवाल गोविंदांनी उपस्थित केला. एवढंच नाही, तर जाहीर केलेली संपूर्ण 51 हजार रुपयांची रक्कम मिळावी, या मागणीसाठी गोविंदांनी थेट दहीहंडीखालीच ठिय्या मांडला आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केलं.



रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा


अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुभाष चौक परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण बक्षिसाची रक्कम मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा गोविंदा पथकाने दिला आहे.आता आयोजक खरंच 51 हजार रुपयांचे बक्षीस देणार का? की जाहीर केलेल्या बक्षिसाच्या रकमेवरून सुरू झालेला हा वाद आणखी चिघळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Comments
Add Comment

BJP News: भाजपाकडून अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, वाचा यादी...

मुंबई: भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

Gondia Accident News: रोजगाराच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, गोंदिया- बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

गोंदिया: गोंदिया- बालाघाट मार्गावरील नागरा- मोहरनटोली परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपच्या भीषण

Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार, कोणकोणत्या भागांना बसणार फटका

पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच

Police Constable Attack : पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर कोयत्याने हल्ला; गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack)  झाल्याची धक्कादायक

Jalgaon : पावसाने पाठ फिरवताच कपाशीवर ‘लाल्या’चं संकट ! उत्पादन घटण्याची भीती, जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर