Musician beaten to death : मनोरंजन विश्वाला धक्का ! गोंधळ थांबवायला खाली आला अन् संगीतकाराची बेदम मारहाणीत हत्या

Musician beaten to death : गायक अंकित बलियानच्या हत्येनंतर गायक बलजीत सिंगच्या संशयास्पद मृत्यूची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका संगीतकाराच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये चोंगथम विक्रम सिंह या संगीतकाराला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या विक्रम सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



गोंधळ सुरू होता शांत राहण्यास सांगितलं अन्..


चोंगथम विक्रम सिंह हे मूळचे मणिपूरचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते दिल्लीमध्ये कुटुंबासोबत राहत होते आणि एका संस्थेसोबत संगीतकार म्हणून काम करत होते. सोमवारी सकाळी त्यांच्या घराबाहेर काही डिलिव्हरी बॉईज आणि ढाब्यावरील कर्मचारी मोठा गोंधळ घालत होते. सततच्या गोंधळामुळे त्रस्त झालेल्या विक्रम सिंह यांनी घराबाहेर येत त्यांना शांत राहण्यास सांगितलं. मात्र, याच कारणावरून वादाला सुरुवात झाली.



वाद वाढला अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण


बोलाबोलीचं रूपांतर काही वेळातच हाणामारीत झालं. आरोप आहे की, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी विक्रम सिंह यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात विक्रम सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



बलजीत सिंगच्या संशयास्पद मृत्यूनेही खळबळ


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ३५ वर्षीय पंजाबी गायक आणि गीतकार बलजीत सिंग यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. बलजीत सिंग अविवाहित असल्याने ते घरात एकटेच राहत होते. काही दिवसांपासून त्यांचं घर बंद होतं. मात्र घरातून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची पाहणी केली आणि बलजीत सिंग यांचा मृतदेह आढळून आला.


एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे मनोरंजन आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Comments
Add Comment

Mumbai Crime : खारमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा; पैशांचे आमिष दाखवून महिलेला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप

मुंबई : खार पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर खार पोलिसांनी

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे

PM Narendra Modi : '८ वर्षे, १ किमीचे कामही पूर्ण झाले नाही'; वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यूपीए सरकारवर घणाघात

रेल्वे मालवाहतूक जाळे पूर्ण क्षमतेने सुरू वडोदरा येथील भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये साकारणार ‘श्री त्र्यंबकराजा’ची भव्य प्रतिकृती ! गौतमी गोदावरी धरणातील बेटावर १७ कोटींचा विकास

Simhastha Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला

Panvel CSMT AC Local : पनवेल-CSMT एसी लोकल न थांबल्याने प्रवाशांमध्ये भीती; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

नवी मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी

Nitesh Rane on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाशी संबंध नसेल तर आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का दाखल केली ? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य