Police Constable Attack : पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर कोयत्याने हल्ला; गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack)  झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळांजवळ गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना तेथून जाण्यास सांगितल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात पोलिस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बांबल हे पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर होते. त्यावेळी रेल्वे रुळांच्या जवळ काही तरुण गांजा सेवन करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना बांबल यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, यावरून त्यांच्यात वाद झाला. (Pune News)


वाद वाढल्यानंतर कोयत्याने हल्ला


वाद वाढल्यानंतर संबंधित तरुणांनी बांबल यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एका व्यक्तीने धारदार कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Crime News)

ड्युटी बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच अशाप्रकारे हल्ला झाल्याने पुणे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. (Pune Police)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते, तसेच आरोपींची ओळख पटली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपासातून या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील समोर येणार आहे. (Pune Police Attack)
Comments
Add Comment

BJP News: भाजपाकडून अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर, वाचा यादी...

मुंबई: भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

Gondia Accident News: रोजगाराच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, गोंदिया- बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

गोंदिया: गोंदिया- बालाघाट मार्गावरील नागरा- मोहरनटोली परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपच्या भीषण

Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार, कोणकोणत्या भागांना बसणार फटका

पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच

Jalgaon : पावसाने पाठ फिरवताच कपाशीवर ‘लाल्या’चं संकट ! उत्पादन घटण्याची भीती, जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचे ‘सेकंड ड्रीम होम’ ? 'या' ठिकाणी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता लोणावळ्यात आपलं ‘सेकंड ड्रीम होम’